अ‍ॅपशहर

अमेरिका म्हणजे जग नव्हे: चीन

अणु पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वात चीन 'आडवे' आल्याने भारतातून तीव्र संताप व्यक्त होत असताना भारत-अमेरिका वाढत्या मैत्रीबाबत चीनला असलेली 'पोटदुखी'ही आता बाहेर आली आहे. 'अमेरिका म्हणजे संपूर्ण जग नाही, हे भारताने ध्यानात घ्यावे', अशी 'मळमळ' चीनचं सरकारी माध्यम असलेल्या 'ग्लोबल टाइम्स' या दैनिकातून व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Times 28 Jun 2016, 3:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पेचिंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhis nsg bid upset by rules not beijing china
अमेरिका म्हणजे जग नव्हे: चीन


अणु पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वात चीन 'आडवे' आल्याने भारतातून तीव्र संताप व्यक्त होत असताना भारत-अमेरिका वाढत्या मैत्रीबाबत चीनला असलेली 'पोटदुखी'ही आता बाहेर आली आहे. 'अमेरिका म्हणजे संपूर्ण जग नाही, हे भारताने ध्यानात घ्यावे', अशी 'मळमळ' चीनचं सरकारी माध्यम असलेल्या 'ग्लोबल टाइम्स' या दैनिकातून व्यक्त करण्यात आली आहे. भारत स्वार्थी असल्याचा कांगावाही या दैनिकाने केलाय.

'अमेरिकेचा पाठिंबा मिळाला म्हणजे संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळाला, असे भारताने समजू नये', अशी भाषा करत भारतीय नागरिक आणि मीडियाला लक्ष्य करणाऱ्या चीनने दुसरीकडे भारत सरकारने दाखवलेल्या सभ्यतेबाबत मात्र समाधान व्यक्त केलं आहे.

'अण्वस्त्र प्रसारविरोधी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी न करणाऱ्या भारताला एनएसजी सदस्यत्व मात्र हवे आहे. त्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. सेऊल येथील बैठकीआधी भारतात या मुद्द्यावर प्रचंड खल झाला. तेथील काही माध्यमांनी तर एनएसजी सदस्य असलेल्या ४८ पैकी ४७ देशांचा भारताला पाठिंबा आहे आणि केवळ चीनचाच भारताला विरोध आहे, असा दावा केला, मात्र त्यात तथ्य नाही', असे 'ग्लोबल टाइम्स'च्या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे. १९७५ मध्ये एनएसजीची स्थापना झाली तेव्हाच सर्व सदस्यांसाठी 'एनपीटी'वर स्वाक्षरीची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे या मूळ अटीचेच पालन होणार नसेल तर चीन आणि अन्य देशांनी भारताच्या सदस्यत्वाला विरोध करणे स्वाभाविकच असल्याचा तर्कही या सरकारी माध्यमात मांडण्यात आला आहे.

एनएसजी सदस्यत्व हुकले तरी कालच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचे (एमटीसीआर) संपूर्ण सदस्यत्व भारताला मिळाले आहे तर चीनला मात्र हे सदस्यत्व मिळू शकलेले नाही. त्याचे पडसादही चिनी माध्यमांमध्ये उमटले आहेत. भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला विरोध केल्याने चीनबद्दल आगपाखड करण्यात आली असली तरी एमटीसीआरबाबत आम्ही तसे करणार नाही. अशाप्रकारचे धक्के पचवण्यास चीन सक्षम आहे, असा दावाही 'ग्लोबल टाइम्स'सह तेथील काही माध्यमांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज