अ‍ॅपशहर

Coronavirus delta variant जगासाठी धोक्याचा इशारा?; ' इतक्या' देशांमध्ये आढळला डेल्टा वेरिएंट

Delta variant updates: जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात करोनाचा डेल्टा वेरिएंट फैलावत आहे. इतर वेरिएंटमुळे डेल्टा वेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याने अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2021, 1:17 pm
जिनिव्हा: जगभरात करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे करोनाच्या नवीन वेरिएंटमुळे या प्रयत्नांवर पाणी फेरले जात असल्याचे चित्र आहे. करोनाचा डेल्टा वेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. डेल्टा वेरिएंट जगभरात फैलावत असून ८५ देशांमध्ये आढळला असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus-world
जगासाठी धोक्याचा इशारा?; ८५ देशांमध्ये आढळला डेल्टा वेरिएंट


जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा वेरिएंटच्या संसर्गावरून इशाराही दिला आहे. डेल्टा वेरिएंटच्या संसर्गाचा दर कायम राहिल्यास करोनाच्या इतर विषाणूंपेक्षा अधिक वर्चस्व निर्माण करू शकतो. आतापर्यंत ८५ देशांमध्ये डेल्टा वेरिएंट बाधित रुग्ण आढळले आहेत.

वाचा: चांगली बातमी! फायजर, अॅस्ट्राझेनेका लशीचा एक डोस ६० टक्के प्रभावी

जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने २२ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या साप्ताहिक अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर अल्फा वेरिएंट १७० देश अथवा भागांमध्ये आढळला आहे. तर, बीटा वेरिएंट ११९ देश, गॅमा वेरिएंट ७१ देश आणि डेल्टा वेरिएंट ८५ देशांमध्ये आढळला आहे.

वाचा: करोना लसीकरण वेगात; पण अमेरिकेने घेतलाय 'याचा' धसका !मागील आठवड्यात (१४ जून ते २० जून ) सर्वाधिक करोनाबाधित भारतात आढळले. या कालावधीत भारतात चार लाख ४१ हजार ९७६ बाधित नोंदवण्यात आले. मात्र, त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. करोना बळींची संख्याही भारतात अधिक नोंदवण्यात आली. भारतात १६ हजार ३२९ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज