अ‍ॅपशहर

ट्रम्प उ. कोरियात; किम यांनी केलं स्वागत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ऐतिहासिक पाऊल उचलत उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी माध्यमांच्या साक्षीने एकमेकांशी हस्तांदोलन करत फोटोग्राफर्सना खास पोज दिल्या. ट्रम्प आणि किम जोंग यांची ही तिसरी भेट असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियाचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2019, 5:03 pm
पनमुनजोम :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Trump-kim

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ऐतिहासिक पाऊल उचलत उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी माध्यमांच्या साक्षीने एकमेकांशी हस्तांदोलन करत फोटोग्राफर्सना खास पोज दिल्या. ट्रम्प आणि किम जोंग यांची ही तिसरी भेट असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियाचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर ट्रम्प व किम जोंग यांची ही ऐतिहासिक भेट झाली. किम जोंग यांनी ट्रम्प यांचं स्वागत केलं. त्यानंतर उत्तर कोरियाच्या हद्दीत ट्रम्प यांनी पाऊल ठेवले तेव्हा किम जोंग यांनी टाळ्या वाजवल्या व पुन्हा एकदा एकत्र फोटो काढून घेतले.

संपूर्ण जगासाठी हा एक खास क्षण आहे. मी येथे आलोय ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत आहेत, असं आश्वासक वक्तव्य यावेळी ट्रम्प यांनी केलं. विशेष म्हणजे ट्रम्प यांची ही उत्तर कोरियावारी अचानक ठरलेली असून कालच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.

दरम्यान, ट्रम्प -किम जोंग भेट दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. याआधी हनोई येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. ती भेट निष्फळ ठरली होती. त्याआधी सर्वप्रथम दोन्ही नेते सिंगापूरमध्ये भेटले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज