अ‍ॅपशहर

स्टीलचा ग्लास गुदद्वारात अडकला, तरुणाचे तीन दिवस वांदे, डॉक्टरांना म्हणतो चुकून गेला

Shocking News: एका व्यक्तीने नशेत आपल्याच पार्श्वभागात काचेचा ग्लास घातला. त्यानंतर अकडेला ग्लास काढण्याचा त्याने खूप प्रयत्न केला पण दोन दिवस त्याला ते जमलं नाही. त्यामुळे त्याला फार त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी दोन शस्त्रक्रिया करुन तो अडकलेला ग्लास काढला.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2023, 8:32 am
नेपाळ: एका ४७ वर्षीय नेपाळी व्यक्तीने दारूच्या नशेत एक विचित्र कृत्य केलं आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या व्यक्तीच्या गुदद्वारात स्टीलचा ग्लास अडकला होता. शस्त्रक्रिया करून तो ग्लास डॉक्टरांनी बाहेर काढला. तीन दिवस हा ग्लास या व्यक्तीच्या गुदद्वारात होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Glass Stuck in bum


या विचित्र प्रकरणाबाबत जर्नल ऑफ नेपाळ मेडिकल सेंटरमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, सुरुवातीला या व्यक्तीने सांगितले की, ग्लास चुकून आत गेला. नंतर त्याने स्वतः कबुली दिली की त्याने नशेत असताना लैंगिक समाधानासाठी हे केले.

२ कोटी कॅश, ६२ एकर जमीन, १ किलो सोनं; चार भावांकडून लाडक्या बहिणीला ८ कोटींच्या भेटवस्तू
अहवालानुसार, त्याच्या कृतीमुळे तो दोन दिवसांपर्यंत मल करू शकला नाही. त्याला दोन दिवस असह्य वेदना होत होत्या. तो गॅसही पास करू शकला नाही. मात्र, सुदैवाने त्याला रक्तस्त्राव झाला नाही. या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले की त्याने स्वतः ग्लास काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.


यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा एक्स-रे काढला. तसेच, ग्लास काढण्याचा प्रयत्न केला. पण, तो गुदद्वाराच्या आत उलटा अडकलेला होता. यानंतर डॉक्टरांनी एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी (Exploratory laparotomy) शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया पोटासाठी केली जाते. पण, डॉक्टरांना त्यातही अपयश आले. त्यानंतर डॉक्टरांनी एंटरोस्टोमी (Enterostomy) शस्त्रक्रिया केली. यानंतर डॉक्टरांनी ग्लास यशस्वीपणे काढला.

बापरे! डास चावल्याने महिला थेट कोमात, जीव वाचवण्यासाठी हात-पाय कापावे लागले...
या शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीला ७ दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. सुमारे दोन महिन्यांच्या फॉलोअपनंतर, डॉक्टरांनी सांगितले की व्यक्ती आता पूर्णपणे बरी आहे. डॉक्टर त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख