अ‍ॅपशहर

इक्वाडोरच्या तीन तुरुंगात राडा; ६२ जण ठार, अनेक जखमी

Ecuador Prison Riot: इक्वाडोरमधील तीन तुरुंगांमध्ये झालेल्या हिंसाचारात ६२ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. हा हिंसाचार तुरुंगातील गुंडांच्या टोळ्यांनी घडवून आणला असल्याचे पोलिसांनी म्हटले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2021, 12:41 pm
क्विटो: लॅटिन अमेरिकेतील देश इक्वाडोरमध्ये मंगळवारी तीन तुरुंगामध्ये झालेल्या कैद्यांच्या गटातील गँगवारमध्ये ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. गुआयस, अजूआय आणि कोटोपाक्सीच्या तुरुंगात हा हिंसाचार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ecuador-prison
इक्वाडोरच्या तीन तुरुंगात राडा; ६७ जण ठार, अनेक जखमी


गुआयकिल शहराचे पोलीस प्रमुख पॅट्रिसियो कारिल्लो यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांकडून हा हिंसाचार थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले. हिंसाचार झालेल्या तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुरुंगातील हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या हिंसाचारानंतर ठार झालेल्या कैद्यांच्या नातेवाईकांनी तुरुंगाबाहेर आक्रोश केला. यावेळी काहींनी तुरुंगात घुसण्याचा प्रयत्न केला. तुरुंगाबाहेरही पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

वाचा: हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू, तरीही मृतदेहाला दिली फाशी



वाचा: बापरे! जगातील २० टक्के करोनाबाधितांचे मृत्यू 'या' देशात

अनादोलू या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, तुरुंगातील एका वॉर्डमधील कैद्यांवर दुसऱ्या कैद्यांनी हल्ला केला. या तुरुंगात कमीत कमी ५ ० कैदी बंद होते. राष्ट्रपती लेनिन मोरेनना यांनी सांगितले की हा हिंसाचार गुंडांच्या टोळीने घडवून आणला आहे. एकाच वेळी अनेक तुरुंगात हिंसाचार घडवून आणला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी ट्विटवर म्हटले.

इक्वाडोरमध्ये गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये हिंसाचार होत असतो. याआधी डिसेंबर महिन्यात झालेल्या तुरुंगातील हिंसाचारात ११ जण ठार झाली होती. तर, सातजण जखमी झाले होते. दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशांमधील तुरुंगात दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटना घडत असतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज