अ‍ॅपशहर

‘फेताई’ धडकले

अमरावती (आंध्र प्रदेश)'फेताई' वादळ सोमवारी आंध्र प्रदेशतील पूर्व गोदावरी जिल्ह्याला धडकले यामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झाला...

Maharashtra Times 18 Dec 2018, 4:00 am

अमरावती (आंध्र प्रदेश)

'फेताई' वादळ सोमवारी आंध्र प्रदेशतील पूर्व गोदावरी जिल्ह्याला धडकले. यामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झाला. 'फेताई'ची तीव्रता कमी झाल्याने त्याचे रुपांतर वादळात झाले. दुपारी १२.२५ मिनीटांनी ते धडकले. यावेळी ताशी ८० किमी वेगाने वारे वाहात होते. विजयवाडा शहरात पावसाने भिंत कोस‌ळून एकजण ठार झाला. मात्र याशिवाय अन्य हानी झालेली नाही. वादळामुळे दक्षिणमध्य रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज