अ‍ॅपशहर

Chicago gunfire अमेरिका: शिकागोत पुन्हा गोळीबार, सात जण जखमी

gunfire in Chicago: अमेरिकेतील शिकागोमध्ये एका अज्ञाताने केलेल्या गोळीबारात सात जण जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2021, 9:33 am
शिकागो: अमेरिकेतील शिकागोमध्ये झालेल्या गोळीबारात सातजण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. या गोळीबारात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेच्या हाताला आणि पोटाला गोळी लागली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Chicago-firing
अमेरिका: शिकागोत गोळीबार, सात जण जखमी


वृ्त्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात जखमी झालेल्या एका जखमीची प्रकृती स्थिर आहे. पाचजणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या गोळीबार प्रकरणी मंगळवारी सकाळपर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. या हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या हल्ल्याचे नेमके कारण समोर आले नाही.

वाचा: चार आठवड्यात महायुद्ध सुरू होणार? रशियन विश्लेषकांनी दिला इशारा

मागील काही महिन्यांमध्ये अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी, ईस्टरच्या दिवशीदेखील शिकागोत गोळीबार झाला होता. या घटनेत १० जण जखमी झाले होते.

वाचा: भारतात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; 'या' कारणामुळे जगाला चिंता

मागील आठवड्यात शिकागोतच अॅडम टोडेलो नावाच्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी गोळी मारली होती. या अल्पवयीन मुलाच्या हातात बंदूक होती. बंदूक घेऊन तो पोलिसांसमोरून धावत होता. पोलिसांनी इशारा देऊन तो थांबला नव्हता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या मुलाचा मृ्त्यू झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज