अ‍ॅपशहर

पाहा: न्यूयॉर्कला मुसळधार पावसाने झोडपले; सात ठार, अनेक ठिकाणी पूर सदृष्य स्थिती!

अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीतील नीवार्क शहराला वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पूर सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा विमान सेवेवरही परिणाम झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Sep 2021, 4:11 pm
न्यूयॉर्क: अमेरिकेतील उत्तर पूर्व भागात आलेल्या आइडा आणि इतर वादळांच्या परिणामी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. न्यूयॉर्क शहरातील भुयारी मार्ग पुरामुळे बंद ठेवण्यात आले आहे. न्यू जर्सीमधील निवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. न्यूजर्सी ट्रान्झिटने सर्व रेल्वे सेवा स्थगित केली आहे. या मुसळधार पावसामुळे न्यूयॉर्क शहरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. महापौर बिल ब्लासिओ यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम flash-flood-New-York-1
न्यूयॉर्कला मुसळधार पावसाने झोडपले



न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासियो यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळ गाठवण्याचे आवाहन केले. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. न्यूजर्सीचे राज्यपाल फिल मर्फी यांनी आणीबाणीची घोषणा केली.


नॅशनल वेदर सर्व्हिसने न्यूयॉर्क, ब्रुकलिन आणि क्वींसमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. स्टेटन आयर्लंडमध्ये बचाव मोहीम सुरू आहे. तर, वादळाच्या शक्यतेकडेही लक्ष ठेवले जात आहे. नीवार्क विमानतळावर सहा मिनिटात अर्धा इंच पाऊस झाला. तर, २३ मिनिटांमध्ये १.५३ इंचाच्या पावसाची नोंद झाली.



नीवार्कमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काही हवामान तज्ज्ञांनी मागील १००-५०० वर्षात होणारा पाऊस यावर्षी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. आइडा चक्रीवादळ हे सन २००५ मध्ये आलेल्या कॅटरिना चक्रीवादळापेक्षाही अधिक मोठे असू शकते आणि मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज