अ‍ॅपशहर

फ्लोरिडातील क्लबमध्ये गोळीबार; ५० जण ठार

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पल्स गे नाईट क्लबमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार तर ५३ जण जखमी झाले असून हल्लेखोराचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Maharashtra Times 12 Jun 2016, 8:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । फ्लोरिडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम florida pulse gay nightclub attacked in orlando
फ्लोरिडातील क्लबमध्ये गोळीबार; ५० जण ठार


अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पल्स गे नाईट क्लबमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार तर ५३ जण जखमी झाले असून हल्लेखोराचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

क्लबमध्ये घुसलेल्या बंदुकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी हल्लेखोराने अनेक लोकांना ओलीस धरले होते. हल्लेखोराच्या कमरेला बॉम्ब बांधल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोरांनी किती लोकांना ओलीस ठेवले याची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी नाईट क्लबच्या चारही दिशांनी वेढा घातला आहे. ओलिसांना सुरक्षित सोडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू केले परंतु यामध्ये ५० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात ५० जण ठार झाले असून ५३ जण जखमी आहे. यामध्ये एक हल्लेखोराने आत्मघातकी बॉम्ब शरीरावर बांधून ठेवल्याचे कळते. पोलीस -हल्लेखोराच्या धुमश्चक्रीनंतर हल्लेखोराचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज