अ‍ॅपशहर

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती चिंताजनक

आरोग्याची तक्रार आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून भ्रष्टाराच्या प्रकरणी जामिनावर सुटलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या रक्तातील पेशी ४५ हजारावरून २५ हजारावर आल्या आहेत. त्यांना श्वसनासही त्रास होत असल्याने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरीफ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त पसरल्याने त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2019, 8:44 pm
लाहोर: आरोग्याची तक्रार आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून भ्रष्टाराच्या प्रकरणी जामिनावर सुटलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या रक्तातील पेशी ४५ हजारावरून २५ हजारावर आल्या आहेत. त्यांना श्वसनासही त्रास होत असल्याने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरीफ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त पसरल्याने त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nawaz-sharif


इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शनिवारी अल अजीजिया भ्रष्टाचार प्रकरणातून नवाज शरीफ यांना मंगळवारपर्यंत जामीन दिला होता. याप्रकरणी शरीफ सात वर्षापासून शिक्षा भोगत आहेत. याआधी शुक्रवारी धनादेशाच्या एका प्रकरणात लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. वैद्यकीय कारणाच्या आधारावर दोन्ही न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता.

दरम्यान, शरीफ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी शरीफ यांच्या रक्तातील पेशी ४५ हजारावरून २५ हजारावर आल्या. त्यांच्या प्रकृतीत किंचितसी सुधारणा झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे, अशी माहिती रुग्णालयाचे सीएओ डॉ. मोहम्मद अयाज यांनी दिली.

गेल्या सोमवारीच भ्रष्टाचार विरोधी पथकाने शरीफ यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल केले होते. शरीफ यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारावेळी त्यांच्या रक्तातील पेशीही कमी होत असल्याचं आढळून आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, शरीफ यांची प्रकृती ढासळल्याचं कळल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी केली आहे. शरीफ यांना लवकर बरे वाटावे म्हणून त्यांच्या समर्थकांकडून नमाज अदा केली जात आहे. दरम्यान, शरीफ यांच्यावर लाहोर तुरुंगात विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.डॉन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नवाझ शरीफ यांच्याविरोधात कट शिजत असल्याचा आरोप लंडनमध्ये राहणाऱ्या हुसैन नवाझ यांनी केला होता. ही विषाची लक्षणे आहेत. नवाझ शरीफ यांना काही झालं तर त्याची जबाबदारी कुणाची आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, असं ट्विट हुसैन नवाझ यांनी केलं होतं. नवाझ शरीफ यांचं वैद्यकीय अहवाल मंगळवारी आला. त्यानुसार, शरीफ यांच्या शरीरातील पेशींची संख्या १६ हजारांहून कमी झाल्या असून दोन हजारांपर्यंत आल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं त्यांची प्रकृती बिघडली आहे.

नवाझ शरीफ यांना लाहोर तुरुंगात दिलं विष?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज