अ‍ॅपशहर

टीव्हीवर लाइव्ह शोमध्ये हाणामारी; अँकरलाही मार

टीव्हीवरील लाइव्ह शोमध्ये चर्चेदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये बाचाबाची होते. त्यांच्यातील वाद टोकाला गेलाच तर ते चर्चा अर्धवट सोडून व्यासपीठावरून निघून जातात. पण जॉर्जियात काही दिवसांनी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका टीव्हीवर आयोजित केलेल्या लाइव्ह शोमध्ये चर्चेदरम्यान दोन नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. 

Maharashtra Times 27 Sep 2016, 2:54 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जॉर्जिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम freestyle between two politicians in live tv show
टीव्हीवर लाइव्ह शोमध्ये हाणामारी; अँकरलाही मार


टीव्हीवरील लाइव्ह शोमध्ये चर्चेदरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये बाचाबाची होते. त्यांच्यातील वाद टोकाला गेलाच तर ते चर्चा अर्धवट सोडून व्यासपीठावरून निघून जातात. पण जॉर्जियात काही दिवसांनी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका टीव्हीवर आयोजित केलेल्या लाइव्ह शोमध्ये चर्चेदरम्यान दोन नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या अँकरलाही मार बसला.

येत्या ८ ऑक्टोबरला जॉर्जियात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील इरेबिया या वाहिनीनं लाइव्ह डिबेट शो घेतला. या शोमध्ये राजकीय पक्षांचे नेते आणि विश्लेषक आले होते. चर्चा सुरू असतानाच रिफॉर्मिस्ट पक्ष आणि इंडस्ट्रियल पक्षाच्या नेत्यामध्ये बाचाबाची झाली. शाब्दिक चकमकीनंतर वाद टोकाला गेला. त्यातील एकानं रागाच्या भरात विरोधी पक्षाच्या नेत्यावर ग्लास फेकला. एवढ्यावरच त्याचा राग शांत झाला नाही. पारा चढलेल्या त्या नेत्यानं जागेवरून उठून थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. लाइव्ह शोदरम्यान हा प्रकार घडल्यानं हडबडून गेलेल्या महिला अँकरनं हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही शांत राहण्याचं आवाहन केलं. पण मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या या अँकरलाही काही प्रमाणात मार बसला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज