अ‍ॅपशहर

सीनिअर बुश यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार

​अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांना बुधवारी नॅशनल कॅथेड्रलमध्ये अंत्यसंस्कारासंबंधी राजकीय सन्मान प्रदान केला जाईल. त्यानंतर गुरुवारी टेक्सास येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ९४ वर्षीय सीनिअर बुश यांचे शुक्रवारी निधन झाले होते.

Maharashtra Times 3 Dec 2018, 1:15 am
ह्युस्टन :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bush


अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांना बुधवारी नॅशनल कॅथेड्रलमध्ये अंत्यसंस्कारासंबंधी राजकीय सन्मान प्रदान केला जाईल. त्यानंतर गुरुवारी टेक्सास येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. ९४ वर्षीय सीनिअर बुश यांचे शुक्रवारी निधन झाले होते.

सीनिअर बुश यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा केली आहे. एअर फोर्स वन विमानातून बुश यांचे पार्थिव वॉशिंग्टन डीसीला आणून अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सीनिअर बुश यांच्या कार्यालयाने टेक्सासच्या ह्युस्टन, वॉशिंग्टन डीसी आणि स्प्रिंग एंड कॉलेज स्टेशन येथील अंत्यसंस्कारासंबंधी विविध सरकारी कार्यक्रम आणि रिवाजांचा तपशील जाहीर केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज