अ‍ॅपशहर

काबुलमध्ये दर्ग्यावर हल्ला; १४ ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मोहरमच्या आदल्या रात्रीच शियापंथीयांच्या दर्ग्यावर हल्ला करण्यात आला आहे. दर्ग्यात घुसलेल्या बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात किमान १४ ठार तर ३६ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

Maharashtra Times 12 Oct 2016, 2:35 am
मटा ऑनलाइन वृत्त । काबुल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gunmen attack shiite shrine in kabul 14 killed
काबुलमध्ये दर्ग्यावर हल्ला; १४ ठार


अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मोहरमच्या आदल्या रात्रीच शियापंथीयांच्या दर्ग्यावर हल्ला करण्यात आला आहे. दर्ग्यात घुसलेल्या बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात किमान १४ ठार तर ३६ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला.

काबुलमधील या दर्ग्यात अशुरा उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होते. या लोकांना हल्लेखोराने लक्ष्य केले. सैन्याच्या गणवेषात आलेल्या हल्लेखोराने दर्ग्यात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. सुरुवातीला दर्ग्यात तीन हल्लेखोर असल्याचे सांगण्यात येत होते मात्र अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते सेदिक सिद्दीकी यांनी हल्लेखोर एकच होता व त्याला ठार मारण्यात आले आहे, असे नंतर स्पष्ट केले.

दरम्यान, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खबरदारी म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज