अ‍ॅपशहर

हफीजचा पक्ष घेणार दुसऱ्या पक्षाचे चिन्ह

मुंबईवरील हल्ल्यामागचा सूत्रधार व कुख्यात दहशतवादी हफीज सईद याच्याशी संबंधित मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या पक्षाने पाकिस्तानात होऊ घातलेल्या येत्या ...

PTI 15 Jun 2018, 4:11 am
इस्लामाबाद : मुंबईवरील हल्ल्यामागचा सूत्रधार व कुख्यात दहशतवादी हफीज सईद याच्याशी संबंधित मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या पक्षाने पाकिस्तानात होऊ घातलेल्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत अन्य एका फारशा प्रसिद्ध नसलेल्या पक्षाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. पाकिस्तानातील निवडणूक समितीने 'एमएमएल'चा निवडणूक लढविण्यास परवानगी मागणारा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळल्यानंतर त्या पक्षाने हा निर्णय घेतला आहे. आता हा पक्ष 'अल्लाह ओ अकबर तहरीक' (एएटी) या पक्षाच्या झेंड्याखाली आपले २०० उमेदवार उभे करणार आहे. 'एएटी' हा पक्ष नोंदणीकृत आहे. बहावलपूर येथील मियाँ एहसान बारी यांनी या पक्षाची स्थापना केली आहे. हा पक्षाला 'खुर्ची' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hafiz saeed going to take other party sign
हफीजचा पक्ष घेणार दुसऱ्या पक्षाचे चिन्ह



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज