अ‍ॅपशहर

दहशतवाद्यांच्या यादीतून वगळा; हाफिजचा अर्ज

पाकिस्तानी सरकारच्या नजरकैदेतून नुकताच सुटलेला २६/११च्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यानं संयुक्त राष्ट्र संघात अर्ज करून त्याच्यावरील 'दहशतवादी' हा शिक्का पुसून टाकण्याची मागणी केली आहे. 'जागतिक दहशतवाद्यांच्या यादीतून माझं नाव काढून टाका,' अशी विनंती त्यानं केली आहे.

Maharashtra Times 28 Nov 2017, 4:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hafiz saeed wants his name off un terror list
दहशतवाद्यांच्या यादीतून वगळा; हाफिजचा अर्ज


पाकिस्तानी सरकारच्या नजरकैदेतून नुकताच सुटलेला २६/११च्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद यानं संयुक्त राष्ट्र संघात अर्ज करून त्याच्यावरील 'दहशतवादी' हा शिक्का पुसून टाकण्याची मागणी केली आहे. 'जागतिक दहशतवाद्यांच्या यादीतून माझं नाव काढून टाका,' अशी विनंती त्यानं केली आहे. त्याच्या या पवित्र्यानं अनेकांना धक्का बसला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं डिसेंबर २००८मध्ये हाफिजला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. खरंतर, अमेरिकेनं २००८सालीच त्याला दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. मात्र, त्यावर निर्णय झाला नव्हता. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यानंतर मात्र त्याच्यावर 'दहशतवादी' असा शिक्का मारण्यात आला. अमेरिकेनं त्याच्या डोक्यावर १० अब्ज डॉलरचं इनामही ठेवलं होतं.

मुंबईवरील हल्ल्यानंतर सईदच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर त्यानं 'जमात-उद-दवा' या संघटनेच्या नावाखाली कारवाया सुरू केल्या. गेले काही दिवस तो नजरकैदेत होता. न्यायालयाच्या आदेशानुसार नुकतीच त्याची सुटका करण्यात आली. त्याच्या सुटकेनंतर भारत, अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रसंघानंही चिंता व्यक्त केली होती. असं असतानाही त्यानं दहशतवाद्यांच्या यादीतून नाव वगळण्यासाठी अर्ज केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज