अ‍ॅपशहर

बांगलादेशात दोन हिंदू शिक्षकांना तुरुंगवास

इस्लामविरोधी वक्तव्यं केल्यानं बांगलादेशात दोन हिंदू शिक्षकांना सहा महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कृष्णापाडा मौली आणि अशोक कुमार अशी या दोघांची नावं आहेत. कुराण अल्लाहने सांगितलेलं नाही आणि स्वर्ग वगैरे काही नसतं, असं मत मांडल्यानं शाळेत मोठाच 'राडा' झाला.

Maharashtra Times 28 Apr 2016, 8:46 am
मटा ऑनलाइन वृत्त । ढाका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindu teachers jailed in bangladesh for defaming islam
बांगलादेशात दोन हिंदू शिक्षकांना तुरुंगवास


इस्लामविरोधी वक्तव्यं केल्यानं बांगलादेशात दोन हिंदू शिक्षकांना सहा महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कृष्णापाडा मौली आणि अशोक कुमार अशी या दोघांची नावं आहेत.

हिजला हायस्कूलमध्ये अशोक कुमार हे विज्ञान विषय शिकवतात. तीन-चार दिवसांपूर्वी वर्गात शिकवताना, कुराण अल्लाहने सांगितलेलं नाही आणि स्वर्ग वगैरे काही नसतं, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळे 'कट्टर' विद्यार्थी चिडले आणि त्यांनी मुख्याध्यापक कृष्णापाडा मौली यांच्याकडे तक्रार केली. परंतु, त्यांनीही अशोक कुमार यांच्या मतांचं समर्थन करताच प्रकरण चिघळलं. ही बातमी गावांत पसरताच, विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही शिक्षकांवर लाठीहल्ला केला. त्यांच्यापासून वाचण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर पोलीस शाळेत पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

या दोघा शिक्षकांना कोर्टापुढे नेलं असता, एका धर्माचा अपमान केल्याचा गुन्हा त्यांनी कबूल केला. तेव्हा, एका ब्रिटिशकालीन कायद्यान्वये त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मुस्लिमबहुल बांगलादेशात इस्लामिक कायद्याचा आग्रह धरणारे विरुद्ध धर्मनिरपेक्षतेचं समर्थन करणारे, असा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. अनेक लेखकांवर, समाजिक कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झालेत, तर अनेकांची निर्घृण हत्याही करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज