अ‍ॅपशहर

पाकच्या सिनेटवर पहिल्यांदाच हिंदू महिलेची निवड

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थार येथे राहणाऱ्या कृष्ण कुमारी कोलही यांनी इतिहास रचला आहे. कृष्ण कुमारी या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला खासदार बनल्या आहेत. विशेष म्हणजे कृष्णा कुमारी या हिंदू दलित असून बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून त्या निवडून आल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Mar 2018, 3:59 pm
कराची: पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थार येथे राहणाऱ्या कृष्ण कुमारी कोलही यांनी इतिहास रचला आहे. कृष्ण कुमारी या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला खासदार बनल्या आहेत. विशेष म्हणजे कृष्णा कुमारी या हिंदू दलित असून बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून त्या निवडून आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindu woman elected to pakistans senate in historic first
पाकच्या सिनेटवर पहिल्यांदाच हिंदू महिलेची निवड


सिंध प्रांतातील आरक्षित मतदारसंघातून त्या निवडून आल्या असून त्यांनी तालिबानशी संबंधित एका मौलानाचा पराभव केल्याचं वृत्त पाकिस्तानातील 'द डॉन' या वृत्तपत्रानं दिलं आहे. या विजयाबरोबरच पाकिस्तानच्या सिनेटवर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या हिंदू महिला खासदार ठरल्या आहेत.

कृष्णा कुमारी या सिंध प्रांतातील थार येथील सुदूर नगरपारकर जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. ३९ वर्षीय कृष्णा कुमारी यांचं वयाच्या १६ व्या वर्षीच लग्न झालं होतं. त्यावेळी इयत्ता नववीत शिकत होत्या. लग्नानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवलं होतं. २०१३ मध्ये त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्राची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावासोबत पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश करून सामाजिक कार्याला प्रारंभ केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज