अ‍ॅपशहर

बेडरुमध्ये नवरा-बायको गाढ झोपेत, अचानक पायाजवळ काहीतरी वळवळलं, लाईट लावून पाहिलं तर...

नवऱ्याने उठून खोलीतील लाईट लावले. लाईट लावताच पाहतातच त्यांना बेडवर असे काही दृश्य दिसले की त्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ते लगेच बेडवरुन खाली उतरले.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2022, 6:14 pm
नवी दिल्ली: रात्री एक जोडपे त्यांच्या बेडरुममध्ये गाढ झोपलेले होते. ते साखरझोपेत होते. तेवढ्यात त्यांना बेडवर काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांची झोप उघडली. नवऱ्याने उठून खोलीतील लाईट लावले. लाईट लावताच पाहतातच त्यांना बेडवर असे काही दृश्य दिसले की त्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ते लगेच बेडवरुन खाली उतरले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम International news
बेडरुमध्ये नवरा-बायको गाढ झोपेत, अचानक पायाजवळ काहीतरी वळवळलं


पती इयान रॉबर्टसन यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या पलंगावर एक महाकाय साप दिसला. सापाला पाहून ते आणि त्यांची पत्नी कॅंडी दोघेही घाबरुन गेले. हे प्रकरण अमेरिकेतील व्हर्जिनियाचे आहे.

हेही वाचा-IND vs SA: रोहित शर्माच्या नावावर होणार खास रेकॉर्ड, असा विक्रम करणारा पहिला भारतीय कर्णधार ठारणार

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ५६ वर्षीय इयान पत्नी कँडीसोबत बेडवर झोपलेले होते. शिफ्ट करुन ते रात्री घरी परतले होते. झोपलेले असताना अचानक त्यांच्या पायावर काहीतरी हालचाल झाल्याचा भास झाला. इयानला वाटले की ती त्यांची पाळीव मांजर असावी. मात्र, जेव्हा त्यांनी लाईट लावून पाहिलं तर ती मांजर नाही साप असल्याचं निष्पन्न झाले.

इयान म्हणाले की, मी बिछाना उचलला आणि पलंगाखाली फेकून दिला. साप जमिनीवर पडला. सुरुवातीला त्यांना वाटलं की ती दोरी असावी. पण जेव्हा तो सरपटायला लागला तेव्हा तो साप असल्याची खात्री त्यांना पटली.

हेही वाचा-नवऱ्याला सोडू शकते, पण मोबाईलला नाही! वर्षभरातच संसार मोडला, बायकोनं काडीमोड घेतला

त्यांनी तात्काळ वनविभागाच्या टीमला पाचारण केले, त्यांनी सापाला वाचवून जंगलात सोडले. हा साप बिनविषारी प्रजातीचा असल्याचे टीमने सांगितले. पण, त्याने चावा घेतल्यास शरीराला नुकसान होऊ शकतं.

५२ वर्षीय कँडी म्हणाल्या की, माझे पती खूप शांत स्वभावाचे आहेत. बचाव केल्यानंतर ते पुन्हा बेडवर झोपायला गेले. तसेच, त्यांची पाळीव मांजर अनेक दिवसांपासून विचित्र वागत होती, कदाचित तिने सापाला पाहिलं असावं, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा-Signal From Space: अंतराळातून ८२ तासांत जवळपास २००० रहस्यमयी सिग्नल, शास्त्रज्ञांची झोप उडाली...
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख