अ‍ॅपशहर

इमरान खान यांच्या पत्नीनं पाकिस्तान सोडला!

अज्ञात व्यक्तींकडून जिवाला धोका असल्याचं सांगत माजी क्रिकेटपटू व पाकिस्तानातील तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इमरान खान यांची घटस्फोटित पत्नी रेहम खान हिनं पाकिस्तान सोडला आहे. तिच्या या निर्णयाचा इमरान खान यांच्याशी संबंध जोडला जात असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2018, 12:19 pm
इस्लामाबाद: अज्ञात व्यक्तींकडून जिवाला धोका असल्याचं सांगत माजी क्रिकेटपटू व पाकिस्तानातील तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इमरान खान यांची घटस्फोटित पत्नी रेहम खान हिनं पाकिस्तान सोडला आहे. तिच्या या निर्णयाचा इमरान खान यांच्याशी संबंध जोडला जात असल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imran khans ex wife leaves pakistan citing threats
इमरान खान यांच्या पत्नीनं पाकिस्तान सोडला!


'जिओ न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत रेहम खाननं स्वत: ही माहिती दिली. 'सहा महिन्यांपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. माझ्याकडं कामाला असलेल्या लोकांच्या फोनवर या धमक्या यायच्या. त्यामुळं मी घाबरले होते. मुलाला शाळेत पाठवणंही बंद केलं होतं. त्याची शाळा बुडत असल्यानं मी अस्वस्थ होते. कुठल्याही राजकीय पक्षानं मला मदत केली नाही. अलीकडं धमक्यांचं प्रमाण खूपच वाढलं होतं. त्यामुळं देश सोडण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडं नव्हता,' असं तिनं म्हटलं आहे.

रेहमनं थेट कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी तिनं इमरान खान यांच्यावर अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त केला आहे. 'इमरान खान यांना विसरून जा आणि त्यांच्याशी कुठलाही वाद घालू नकोस,' असा सल्ला अनेक माजी क्रिकेटपटूंनी मला दिल्याचं तिनं मुलाखतीत सांगितलं. 'आतापर्यंत मी बरंच सहन केलं. अनेक गोष्टी लपवून ठेवल्या. पण लवकरच काही मुद्द्यांवर खुलेपणानं बोलेन,' असंही तिनं स्पष्ट केलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज