अ‍ॅपशहर

यस वी कॅन, यस वी डिड : बराक ओबामा

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपले अध्यक्षपदाच्या कार्यकाळातले अखेरचे भाषण दिले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या मुद्द्यांचे समर्थन केले आहे, त्या मुस्लीमविरोधी, महिला, एलजीबीटी समूह, स्थलांतरितांविरोधी मुद्द्यांवर ओबामा यांनी राष्ट्राला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. 'यस वी कॅन, यस वी डिड, यस वी कॅन' असे म्हणत आपल्या आवडत्या घोषणेने त्यांनी निरोप घेतला.

Maharashtra Times 11 Jan 2017, 9:43 am
मटा ऑनलाइन वृत्त । शिकागो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम in last speech as us president obama warns against racism anti immigrant anti muslim sentiment under trump
यस वी कॅन, यस वी डिड : बराक ओबामा


अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपले अध्यक्षपदाच्या कार्यकाळातले अखेरचे भाषण दिले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या मुद्द्यांचे समर्थन केले आहे, त्या मुस्लीमविरोधी, महिला, एलजीबीटी समूह, स्थलांतरितांविरोधी मुद्द्यांवर ओबामा यांनी राष्ट्राला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. 'यस वी कॅन, यस वी डिड, यस वी कॅन' असे म्हणत आपल्या आवडत्या घोषणेने त्यांनी निरोप घेतला.

आपल्या कार्यकाळातली अमेरिकेची प्रगती, देशापुढची आव्हाने, अमेरिकेची राष्ट्र म्हणून असलेली मूल्ये आणि त्यानुसार येत्या काळातली अपेक्षित वाटचाल अशा विविध मुद्द्यांना ओबामा यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला. ज्या ठिकाणी ८ वर्षांपूर्वी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतली, त्या शिकागोतच देशवासियांना या कार्यकाळातले अखेरचे भाषण देणे त्यांनी पसंत केले. आपली पत्नी आणि मुलींचे त्यांनी कौतुक केले. मिशेल ही केवळ आपली पत्नी आणि आपल्या मुलींची आई नसून आपली उत्तम मैत्रीण असल्याचे त्यांनी सांगितले. 'फोर मोअर इयर्स' अशी घोषणा वारंवार उपस्थित प्रेक्षकांकडून होत होती, त्याला 'ते आता होऊ शकत नाही' असे उत्तर ओबामांनी दिले.

ओबामा यांच्या भाषणातले काही मुद्दे :-

- गेल्या काही वर्षांत मिशेल आणि मला ज्या शुभकामना लाभल्या, त्यांनी आम्ही भारावून गेलो आहोत.

- तुम्ही मला एक चांगला राष्ट्राध्यक्ष, एक चांगला माणूस बनवले.

- जेव्हा सामान्य माणसांचे योगदान लाभते, तेव्हाच बदल घडतो.

- तुमच्यामुळे अमेरिका एक मजबूत देश बनला आहे.

- जोपर्यंत सर्वांना आर्थिक प्रगतीची संधी मिळत नाही, तोपर्यंत लोकशाही काम करू शकत नाही.

- आम्ही अमेरिकेला अधिक सक्षम बनवले.

- आपल्याला भेदभावाविरोधात बनलेल्या मोठ्या कायद्यांसोबत उभे राहायला हवे. जर समाजात कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो प्रयत्न आपण हाणून पाडायला हवा.

- अमेरिका हे महान मूल्यांचे राष्ट्र आहे. म्हणून मी मुस्लीम अमेरिकन्ससोबत होणारा भेदभाव नाकारतो. म्हणूनच मला महिला, एलजीबीटींचे हक्कांचा लढा आपण नाकारू शकत नाही.

- जोपर्यंत आपली घटना अबाधित आहे तोपर्यंत जगावर असलेल्या अमेरिकेच्या प्रभावाच्या जवळही आपले प्रतिस्पर्धी रशिया आणि चीन येऊ शकत नाही. मात्र आपण केवळ अन्य लहान देशांना धमकावणारा मोठा देश बनायला नको.

- लोकशाहीला जेव्हा जेव्हा गृहित धरले जाते, तेव्हा तेव्हा ती धोक्यात येते.

- आपल्या लोकशाहीला तुम्हा प्रत्येक नागरिकाची गरज आहे, केवळ निवडणुकीपुरते नव्हे; सर्वकाळ.

- बदलासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येक अमेरिकी नागरिकामुळे अमेरिका महान राष्ट्र बनले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज