अ‍ॅपशहर

'भारतच आमचा खरा मित्र'; बांगलादेशचे भारतासोबत सात करार

Bangladesh PM on relation with India : भारत आमचा खरा मित्र असल्याचे प्रतिपादन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले. भारत आणि बांगलादेशमध्ये सात द्विपक्षीय करार करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2020, 3:08 pm
ढाका: भारत हा बांगलादेशाचा खरा मित्र असून, १९७१मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारताने केलेल्या सहकार्याबाबत आम्ही कृतज्ञ आहोत, अशी भावना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वेब परिषदेत त्यांनी हे प्रतिपादन केले. भारत व बांगलादेशदरम्यान यावेळी सात द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India-Bangladesh sign 7 pacts
'भारतच आमचा खरा मित्र'; बांगलादेशचे भारतासोबत सात करार


सुरुवातीस पूर्व पाकिस्तान अशी ओळख असणारा हा देश १९७१च्या अखेरीस अस्तित्वात आला. बांगलादेशाच्या निर्मितीला बुधवारी ४९ वर्षे पूर्ण झाली. हसीना यांनी या विजय दिनाचा उल्लेख केला. ‘बांगलादेश विजय दिन साजरा करत असताना, मोदींशी या वेब परिषदेच्या निमित्ताने संवाद साधला जाणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. डिसेंबर आमच्यासाठी स्वातंत्र्याच्या आनंदाचा आहे. वंगबंधू व आमचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रेहमान यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही स्वतंत्र झालो. या विजयात आम्हाला भारताचे बहुमोल सहकार्य लाभले. भारत आमचा खरा मित्र आहे,’ असे त्या म्हणाल्या.

वाचा: धर्माच्या नावाखाली धिंगाणा खपवून घेणार नाही; बांगलादेशच्या पंतप्रधानांनी ठणकावले

‘चालू वर्षात भारतासोबतचे आमचे संबंध आणखी सुधारले असून, यापुढेही त्यात वाढ होईल. आपल्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेले आत्मनिर्भर भारत हे धोरण प्रशंसनीय आहे,’असे त्या मोदी यांना उद्देशून म्हणाल्या. ‘शेजारी देशास प्राधान्य हे आमचे धोरण असून त्यातील बांगलादेश हा प्रमुख घटक आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

वाचा: अद्भूत! अंतराळातून असा दिसतो आपला हिमालय; नासाने जारी केला फोटो

उभय देशांत रेल्वेसेवा

भारत व बांगलादेशामधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्याच्या हेतूने यावेळी कृषी, वस्त्रोद्योग, हायड्रोकार्बन आदी सात विविध क्षेत्रांसंबंधी करार करण्यात आले. यामध्ये उभय देशांदरम्यानच्या रेल्वेसेवेचे पुनरुज्जीवन करण्यासंबंधीचा कराराचाही समावेश आहे. भारतातील कूचबिहार व बांगलादेशातील चिलाहाटी हा रेल्वेमार्ग त्यामुळे खुला होणार आहे. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धापर्यंत ही सेवा सुरू होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज