अ‍ॅपशहर

India Nepal भारताकडून कालापानी, लिपुलेख परत घेणार; नेपाळच्या पंतप्रधानांची वल्गना

India Nepal Border: भारताच्या भूभागावर दावा ठोकत नवीन नकाशा मंजूर करून घेणारे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात फुत्कार सोडले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2021, 8:40 am
काठमांडू: नेपााळमध्ये संसद भंग करून मध्यावधी निवडणुका लादून राजकीय अस्थिरता निर्माण करणारे पंतप्रधाने के. पी. शर्मा ओली यांनी पु्न्हा एकदा भारताविरोधात फुत्कार सोडले आहेत. भारताच्या ताब्यात असलेले लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरी आदी भाग नेपाळकडे घेणार असल्याचे पंतप्रधान ओली यांनी म्हटले. रविवारी झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी सूर आवळला. ओली यांनी याआधीदेखील भारताविरोधात भूमिका घेतल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nepal Prime Minister K P Sharma Oli
भारताकडून नेपाळचा भूभाग पुन्हा घेणार; पंतप्रधान ओलींचे फुत्कार


ओली यांच्या नेतृत्वातील सरकार निष्प्रभ ठरले असून भ्रष्टाचाराचे आरोप, वाढती बेरोजगारी आणि सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी ओली भारतासोबतच्या सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

वाचा: चीनला नेपाळचा धक्का? भारताकडून घेणार करोना लस!

वाचा: ट्रम्प यांच्याविरोधात सोमवारी महाभियोग?; बायडन यांच्या शपथविधीवर हिंसाचाराचे सावट
नेपाळमधील 'माय रिपब्लिका'ने दिलेल्या वृत्तानुसार, सुगौली करारानुसार, महाकाली नदीच्या पूर्वीकडील हे तिन्ही भूभाग नेपाळचे आहेत. ओली यांनी सांगितले की, भारताकडून कूटनीतिक चर्चा करून हे तिन्ही भूभाग पुन्हा घेतले जातील. १९६२ मध्ये भारत-चीनमध्ये झालेल्या युद्धानंतर भारतीय सैन्य या ठिकाणी तैनात करण्यात आली. नेपाळच्या शासकांनी या भागाला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला नसल्याचे ओली यांनी म्हटले.

ओली यांनी म्हटले की, सरकारने नवीन नकाशा जारी केल्यानंतर अनेकजणांना त्रास झाला होता. याआधीचे सरकार भारताच्या अतिक्रमणाविरोधात बोलण्यास धजावत नव्हते. आता मात्र, सरकार या भूभागला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: नेतन्याहू अडचणीत? फायजरच्या लशीसाठी इस्रायलने मोजली ५० टक्के जादा रक्कम!

भारत आणि चीनसोबत हवे चांगले संबंध


ओली यांनी सांगितले की भारत आणि चीन या दोन्ही देशांसोबत द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करण्यात आले आहे. ओली यांनी सांगितले की, काही आठवड्यांआधी नेपाळच्या दौऱ्यावर आलेल्या भारताच्या आणि चीनच्या उच्च अधिकाऱ्यांच्या दौऱ्याची चिंता करता कामा नये. भारतासोबत आम्हाला संबंध चांगले करायचे असून भारतासमोर नेपाळची भूमिका स्पष्टपणे समोर मांडली आहे.

वाचा: ट्रम्प समर्थकांच्या मोर्चात 'यांनी' फडकवला भारतीय तिरंगा !

मे २०२० मध्ये भारतासोबतचा सीमावाद उकरून काढत नेपाळने भारतविरोधी पावले उचलण्यास सुरूवात केली. नेपाळ सरकारने आपल्या नव्या नकाशाला मंजुरी देत भारताच्या भूभागावर दावा केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज