अ‍ॅपशहर

Joe Biden बायडन यांच्या ऐतिहासिक भाषणालाही भारतीय 'टच'

अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणाचे जगभरात कौतुक करण्यात आले. मात्र, बायडन यांचे हे भाषण एका भारतीय वंशाच्या नागरिकाने लिहीले आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2021, 4:04 pm
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या भाषणाचा आणि भारतीय वंशाच्या नागरिकाचा संबंध असल्याचे समोर आले आहे. जगभरात सध्या चर्चेचा विषय ठरलेले बायडन यांचे भाषण भारतीय वंशाच्या विनय रेड्डी यांनी लिहिले होते. सध्याच्या संकटाच्या काळात लोकशाही, एकता आणि आशा यांचे महत्त्व विशद करणाऱ्या या भाषणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेड्डी हे मूळचे तेलंगणचे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम biden-readdy
बायडन यांच्या पहिल्या भाषणाचे भारतीय कनेक्शन माहित आहे का?


राष्ट्रीय राजकारणातील वाद, प्रशासन यासंदर्भातील बायडेन सरकारची काय भूमिका असेल हे अत्यंत संयत आणि प्रोत्साहन देणाऱ्या शब्दांत या भाषणातून मांडण्यात आले होते. मायकेल बेशलॉस या अभ्यासकाने बायडेन यांचे भाषण नम्र भाषेत, गांभीर्य असलेले, शांत आणि प्रोत्साहनात्मक होते, असे ट्वीट केले आहे. माध्यमातील अन्य तज्ज्ञही या भाषणाबाबत कौतुकोद्गार काढत आहेत.

वाचा: बायडन इन अॅक्शन! 'या' आदेशावर स्वाक्षरी; भारतीयांना दिलासा

वाचा: मी पुन्हा येईन! ; ट्रम्प यांनी शेवटच्या भाषणात आळवला सूर

बायडेन यांचे भाषण इतिहास, आदर, एकता या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारे होते. ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधीदरम्यान केलेल्या भाषणाला हे अक्षरशः उत्तर होते, असे ट्वीट पत्रकार मॅट फुलर यांनी केले आहे. तर 'या क्षणाची गरज ओळखून केलेले भाषण, उत्तम कामगिरी,' असे कौतुक टाइम मॅगझिनचे सदरलेखक डेव्हिड फ्रेंच यांनी केले आहे.

वाचा: बायडन यांच्या शपथविधीनंतर ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना चीनचा झटका!

वाचा: बायडन यांच्या शपथविधीनंतर ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना चीनचा झटका!

बायडेन यांनी आपण सध्या तोंड देत असलेली आव्हाने, सगळ्यांनी एकत्र येण्याची निकड यांचा भाषणात उल्लेख केला, त्याबद्दल अभिनंदन, असे ओबामा यांच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी प्रवक्ते टॉमी व्हिएटर यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात बायडेन यांनी रेड्डी यांची आपले शपथग्रहण समारंभाचे भाषण लिहून देण्यासाठी निवड केली होती. रेड्डी यांनी बायडेन आणि हॅरिस यांच्या प्रचारादरम्यानही काम केले आहे. बायडेन अमेरिकेचे उपाध्यक्ष असतानाही रेड्डी हेच त्यांचे भाषणलेखक होते.

कोण आहेत रेड्डी?

रेड्डी हे ओहियोमधील डेटन येथे वाढले. त्यांचे पालक भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. ओहियो पब्लिक स्कूल, मियामी विद्यापीठ आणि ओहियो विधी विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. सध्या ते कुटुंबासह न्यूयॉर्कमध्ये राहतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज