अ‍ॅपशहर

फॅसिस्टांसाठी काम करताना कसे वाटतेय?

‘फॅसिस्टांसाठी काम करायला कसे वाटतेय?’… ‘देशाची वाट लावताना कसे वाटतेय?’… हे आहेत एका भारतीय अमेरिकन महिलेने व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी सीअन स्पाइसर यांना विचारलेले प्रश्न. अचानक समोर आलेल्या स्पाइसर यांच्यावर श्री चौहान (३३) या महिलेने या अनपेक्षित प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यांवर स्पाइसर यांनी ‘वंशद्वेषी’ प्रतिक्रिया दिल्याचा दावाही चौहान यांनी केली.

Maharashtra Times 15 Mar 2017, 4:10 am
भारतीय अमेरिकन महिलेची अमेरिकन मंत्र्यावर सरबत्ती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian american woman questions sean spicer asks him if he committed treason
फॅसिस्टांसाठी काम करताना कसे वाटतेय?


वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

‘फॅसिस्टांसाठी काम करायला कसे वाटतेय?’… ‘देशाची वाट लावताना कसे वाटतेय?’… हे आहेत एका भारतीय अमेरिकन महिलेने व्हाइट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी सीअन स्पाइसर यांना विचारलेले प्रश्न. अचानक समोर आलेल्या स्पाइसर यांच्यावर श्री चौहान (३३) या महिलेने या अनपेक्षित प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यावर स्पाइसर यांनी ‘वंशद्वेषी’ प्रतिक्रिया दिल्याचा दावाही चौहान यांनी केली.

या संपूर्ण संभाषणाचा व्हिडीओही चौहान यांनी शनिवारी ट्विटरवर पोस्ट केला. तो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. चौहान यांच्या सरबत्तीवर स्पाइसर यांनी ‘हा एवढा महान देश आहे, म्हणूनच तुम्ही इथे आहात,’ असे उत्तर दिल्याचे या व्हिडीओत ऐकू येते. स्पाइसर यांचे हे उद्गार ‘वंशद्वेषी’ असल्याचा आरोप चौहान यांनी केला आहे. आपण मंत्री असून हे संभाषण रेकॉर्ड केले जात आहे, हे माहीत असतानाही स्पाइसर यांनी माझ्या तोंडावर हसत हे उत्तर दिले. हे वंशद्वेषी उद्गार असून ही माझ्या अमेरिकन नागरिकत्वाला दिलेली धमकी आहे,’ असे श्री चौहान यांनी म्हटले आहे.

‘अमेरिकेत स्वातंत्र्य असून लोक त्यांच्या इच्छेसार वागू शकतात,’ असे स्पाइसर यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितले. तर ‘आमच्या मेहनती प्रतिनिधीशी प्रसारमाध्यमे किती उद्धटपणे वागतात, हे आश्चर्यकारक आहे,’ अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर दिली. मात्र श्री चौहान या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी नाहीत.

शाळांमध्ये विधायक बदलांसाठी पालकांच्या सहभागासाठी प्रयत्नशील असलेल्या एका स्टार्टअपच्या त्या प्रमुख आहेत. आपला आयफोन दुरुस्त करण्यासाठी अॅपल कंपनीच्या एका स्थानिक दुकानात गेल्या असता, त्यांची स्पाइसर यांच्याशी गाठ पडली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज