अ‍ॅपशहर

भारतीय खलाशी अडकले

संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई बंदरात आठ भारतीय खलाशी जहाजावर अडकले असून त्यांना नऊ महिन्यांचे पूर्ण वेतन मिळालेले नाही...

PTI 26 Sep 2018, 4:00 am

दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई बंदरात आठ भारतीय खलाशी जहाजावर अडकले असून त्यांना नऊ महिन्यांचे पूर्ण वेतन मिळालेले नाही. तसेच या खलांशांना पुरेसे अन्न आणि इंधनही नाकारण्यात आल्याचे मंगळवारी उघडकीस आले. संयुक्त अरब अमिरातीचा व्हिसा नसल्याने ते जहाजही सोडू शकत नाहीत. 'आम्ही कसेबसे जिवंत आहोत आणि आमचे वजन सात ते आठ किलोंनी उतरले आहे. आमच्यात आता काहीच ताकद उरलेली नाही. आमच्या कुटुंबालाही घरी त्रास होत आहे आणि सद्याची परिस्थिती तर इतकी वाईट आणि कठीण आहे, की आम्ही अक्षरश: आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत आलो आहोत', असे खलाशांपैकी एकाने सांगितले. आम्ही खलाशांच्या सतत संपर्कात असून, कंपनीकडूनही अडचण सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दुबईतील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज