अ‍ॅपशहर

अमेरिकेत भारतीय व‌िद्यार्थ्याची हत्या

अम‌ेरिकेतील कॅ‌लिफोर्निया राज्यात भारतीय विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. स्थान‌कि वृत्तपत्राने द‌लिेल्या माह‌तिीनुसार, धरमप्रीतस‌िंग जस्सर (२१) असे या व‌द्यिर्थ्याचे नाव असून तो एका धान्याच्या दुकानात नोकरी करत होता.

Maharashtra Times 17 Nov 2017, 1:35 am
वॉशिंग्टन : अम‌ेरिकेतील कॅ‌लिफोर्निया राज्यात भारतीय विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. स्थान‌कि वृत्तपत्राने द‌लिेल्या माह‌तिीनुसार, धरमप्रीतस‌िंग जस्सर (२१) असे या व‌द्यिर्थ्याचे नाव असून तो एका धान्याच्या दुकानात नोकरी करत होता. मंगळवारी रात्री दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या चार चोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांमध्ये एका भारतीय वंशाच्या तरुणाचाही समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian student 21 shot dead at grocery store in california
अमेरिकेत भारतीय व‌िद्यार्थ्याची हत्या


दुकानात चोर शिरल्यानंतर धरमप्रीतस‌िंग गल्ल्यामागे लपला. एका चोराच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. रात्री उश‌रिा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाला धरमप्रीतस‌िंग रक्ताच्या थारोळ्यात पडलेला द‌सिल्यानंतर त्याने पोल‌सिांना याबाबत कळवले. चोरांनी धरमप्रीतस‌िंग काम करत असलेल्या दुकानात प्रवेश करण्यापूर्वी या परिसरातील अन्य काही दुकानांमध्येही चोरी केल्याची माह‌तिी पोल‌सिांनी द‌लिी आहे. याप्रकरणी पोल‌सिांनी एका २२ वर्ष‌ीय भारतीय वंशाच्या तरुणाला अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज