अ‍ॅपशहर

भारतातली ५८ टक्के संपत्ती १ टक्क्यांकडे!

भारताच्या एकूण संपत्तीपैकी तब्बल ५८ टक्के संपत्ती अवघ्या १ टक्का गर्भश्रीमंतांकडे आहे! विशेष म्हणजे हे प्रमाण जगाच्या तुलनेतही अधिक आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण ५० टक्के आहे.

Maharashtra Times 16 Jan 2017, 1:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । डावोस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indias rising income inequality richest 1 own 58 of total wealth
भारतातली ५८ टक्के संपत्ती १ टक्क्यांकडे!


भारताच्या एकूण संपत्तीपैकी तब्बल ५८ टक्के संपत्ती अवघ्या १ टक्का गर्भश्रीमंतांकडे आहे! विशेष म्हणजे हे प्रमाण जगाच्या तुलनेतही अधिक आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण ५० टक्के आहे.

ऑक्स्फाम या संस्थेने हे संशोधन जारी केले आहे. निमित्त आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक सभेचे. या सभेला जगातले श्रीमंत, बलाढ्य हजेरी लावतात. या संस्थेच्या अभ्यासानुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ ५७ अब्जाधीशांकडे उर्वरित ७० टक्के भारतीयांच्या एकूण संपत्तीइतकी संपत्ती आहे. या ८४ भारतीय अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानी (९.३ अब्ज डॉलर्स!) दिलीप संघवी (१६.७ अब्ज डॉलर्स), अझीम प्रेमजी (१५ अब्ज डॉलर्स) यांचा समावेश आहे. भारताची एकूण संपत्ती आहे ३.१ ट्रिलीयन (खर्व) डॉलर्स.

'अॅन इकॉनॉमी ऑफ ९९ पर्सेंट' असे या अहवालाचे नाव आहे. आता प्रत्येकाला फायदेशीर ठरेल अशी संपत्ती बनवण्याची वेळ आली आहे, असे ऑक्स्फामने म्हटले आहे. भारतात असलेल्या आर्थिक असमतोलाच्या कारणांमध्ये 'जेंडर पे गॅप' हे एक महत्त्वाचे कारण ऑक्स्फामने नमूद केले आहे. सारख्याच कामाचा मोबदला महिलांना पुरुषांपेक्षा कमी मिळतो, त्यामुळे उत्पन्नाची तफावत ३० टक्क्यांनी वाढते असे हा अहवाल सांगतो.

जगात आठ गर्भश्रीमंत!

जगाच्या पातळीवर सांगायचे तर जगातल्या केवळ ८ अब्जाधीशांकडे उर्वरित जगाच्या ५० टक्के लोकांकडे असणाऱ्या संपत्तीइतकी संपत्ती आहे. जगाची एकूण संपत्ती २५५.७ ट्रीलीयन डॉलर्स आहे, त्यापैकी ६.५ ट्रीलीयन डॉलर्स ज्या अब्जाधीशांकडे आहेत, त्यात बिल गेट्स (७५ अब्ज डॉलर्स), अमॅन्सिओ ओर्टेगा (६७ अब्ज डॉलर्स) आणि वॉरन बफे (६०.८ अब्ज डॉलर्स) आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज