अ‍ॅपशहर

इंडोनेशियात भूकंपानंतर त्सुनामीचे संकट

इंडोनेशियाच्या सुलावेसी द्विपमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर या परिसरात त्सुनामीने संकट उभे ठाकले आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2018, 8:45 pm
जकार्ता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Indonesian


इंडोनेशियाच्या सुलावेसी द्विपमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर या परिसरात त्सुनामीने संकट उभे ठाकले आहे. इंडोनेशियाच्या जिओफिजिक्स विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इंडोनेशियाच्या एका न्यूज चॅनेलने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत समुद्राच्या लाटा प्रचंड वेगाने येत असून लोक भीतीने पळत सुटले आहेत. जिओफिजिक्सच्या विभागाच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्सुनामीसंबंधी अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व माहिती मिळाल्यानंतर ती जनतेसमोर आणू, असे विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मध्य सुलावेसीच्या डोंग्गाला परिसरात १० किलोमीटर खोलपर्यंत भूकंपाचे धक्के जावणले आहेत. या भूकंपाआधी या ठिकाणी कमी तीव्रतेचा भूकंप आला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.



आज आलेल्या शक्तीशाली भूकंपाचा केंद्रबिंदू पालू शहरापासून ७८ किलोमीटरवर आहे. भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने त्याचे धक्के सर्वात मोठे शहर मकासर पर्यंत बसले होते. डिसेंबर २००४ साली पश्चिम इंडोनेशियाच्या सुमात्रा या ठिकाणी मोठा भूकंप आला होता. या भूकंपाची तीव्रता ९.३ रिश्टर स्केल इतकी होती. यानंतर आलेल्या त्सुनामीत अनेक देशातील २,२०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज