अ‍ॅपशहर

२.५ अब्जचा हिरा; 'भारतीयां' विरोधात वॉरंट

२.५ अब्ज किंमतीच्या बहुमूल्य गुलाबी हिऱ्या प्रकरणी इंटरपोलने दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या चार व्यापाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. रशियातील एक दूरसंचार उद्योगपती आणि हिऱ्याच्या स्थानिक डीलरमध्ये हिऱ्यावरील स्वामित्वाचे दावे केले जात आहेत.

Maharashtra Times 15 Aug 2017, 7:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जोहान्सबर्ग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम interpol warrants against 4 indian origin bizmen over rs 2 5 billion rare diamond
२.५ अब्जचा हिरा; 'भारतीयां' विरोधात वॉरंट


२.५ अब्ज किंमतीच्या बहुमूल्य दुर्मिळ गुलाबी हिऱ्या प्रकरणी इंटरपोलने दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या चार व्यापाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. रशियातील एक दूरसंचार उद्योगपती आणि हिऱ्याच्या स्थानिक डीलरमध्ये हिऱ्यावरील स्वामित्वाचे दावे केले जात आहेत. हे प्रकरण कोर्टात गेल्याने भारतीय वंशाच्या व्यापाऱ्यांविरोधात ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे जुनैद मोती, त्यांचे वडील अब्बास अबू बकर आणि त्यांचे दोन सहकारी अशरफ काका आणि सलीम बोबत यांच्याविरोधात ही नोटीस आहे. या नोटीसविरोधात मोती यांनी प्रिटोरियातील हायकोर्टात धाव घेतली आहे. ही तिहेरी कायदेशीर लढाई फ्रान्स, लेबनान, झिम्बाब्वे आणि दुबईतील कोर्टांमध्ये दोन वर्षापासून सुरू आहे, 'द टाइम्स'च्या वृत्तात ही माहिती दिली आहे.

रेड कॉर्नर नोटीस इंटरपोलद्वारे जारी केली जाते. हा आंतरराष्ट्रीय अॅलर्ट असतो. यानुसार हव्या असलेल्या व्यक्तिचा ठावठिकाणा काढून त्याला अटक करणं आणि नंतर हस्तांतर करण्यात येतं. या प्रकरणी चारही आरोपींनी इंटरपोलच्या नोटीसविरोधात स्थानिक कोर्टात धाव घेत अटक रोखण्याची मागणी केली आहे. तसंच रशियाचा उद्योगपती अलीबेक इसाव्हने धोकेबाजीतून हिऱ्याचे कागदपत्र बळकावलेत, असं या चौघांचं म्हणणं आहे.

भारतीय वंशाचे व्यापारी आणि रशियाच्या उद्योगपतीने एकमेकांवर हिरा चोरल्याचा आरोप केला आहे. २००३ मध्ये या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलं. हिऱ्यांचा डीलर मूसा याने २००३ मध्ये भारतीय वंशाच्या व्यापाऱ्यांवर हाच हिरा चोरल्याचा आरोप केला होता.

'आपल्या सहकाऱ्यांना मूसाने एक अश्वस्ती पत्र दिलं होतं. ज्यात हिऱ्याची किंमत कर्जातून फेडल्याचं नमूद करण्यात आलं होतं. रशियाचा उद्योगपती इसाव्हने मोठ्या चालाखीतून लेबनानच्या प्राधिकरणाकडून इंटरपोलची नोटीस जारी करवून घेतली आहे', असं अशरफ काकाने सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज