अ‍ॅपशहर

नव्या आयफोन ७ ला लागली आग, कारही पेटली!

नव्या आयफोन ७ ला आग लागल्याचा दावा ऑस्ट्रेलियातल्या एका नागरिकाने केला आहे. यो फोनने पेट घेतल्याने त्याची कारही जळली. यासंदर्भात अॅपल या ग्राहकाच्या संपर्कात असून फोनच्या दोषाचा तपास केला जात आहे. सर्फर मॅट जोन्स असे या नागरिकाचे नाव आहे.

Maharashtra Times 22 Oct 2016, 2:54 pm
मटा ऑनलाइन वृत्त । ऑस्ट्रेलिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम iphone 7 being investigated after a man claims it set his car on fire
नव्या आयफोन ७ ला लागली आग, कारही पेटली!


नव्या आयफोन ७ ला आग लागल्याचा दावा ऑस्ट्रेलियातल्या एका नागरिकाने केला आहे. यो फोनने पेट घेतल्याने त्याची कारही जळली. यासंदर्भात अॅपल या ग्राहकाच्या संपर्कात असून फोनच्या दोषाचा तपास केला जात आहे.

सर्फर मॅट जोन्स असे या नागरिकाचे नाव आहे. ७ न्यूज वाहिनीशी बोलताना तो म्हणाला,'मी वेल्स बीचवर गेलो होतो. मागच्याच आठवड्यात घेतलेला आयफोन ७ मी पॅंटमध्ये गुंडाळून कारमध्ये ठेवला होता. परत आलो तर कारमधून धूर येत होता. खिडक्याही काळ्या झाल्या होत्या. आतले काहीच दिसत नव्हते.'

आणखी एका फोनमधून केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये हो फोन जळताना दिसात आहे. जोन्सच्या म्हणण्यानुसार, गाडीतून गरम वाफ येत होती, कपडे बाहेर काढले तर त्यातून राख पडत होती. आत मोबाईलही विरघळत होता. हा फोन यापूर्वी पडलाही नव्हता आणि कोणत्या अॅपलव्यतिरिक्तच्या चार्जरने चार्जही केला नव्हता, असा जोन्सचा दावा आहे.

स्मार्टफोनमध्ये असलेली लिथिअम आयर्न बॅटरी खराब झाली तर जळू शकते. अॅपलची प्रतिस्पर्धी असलेली सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट ७ स्मार्टफोनच्या बॅटरीला आग लागल्याच्या १०० पेक्षा जास्त तक्रारी आल्यानंतर त्याचे उत्पादन थांबवावे लागले होते. या प्रकरणी सॅमसंगवर अमेरिकेत खटलाही दाखल झाला होता.


A NSW man says his iPhone 7 burst into flames and filled his car with smoke. https://t.co/7hkrfY9D0f — 7 News Melbourne (@7NewsMelbourne) October 20, 2016

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज