वॉशिंग्टन : सातत्याने इराणवर आगपाखड करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थोडी नमती भूमिका घेतली असून, इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी बिनशर्त भेटण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. अमेरिकेने मेमध्ये अणुकरारातून माघार घेतली होती, तसेच इराणला गंभीर परिणाम भोगावे लागेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर, त्यांनी रुहानी यांच्याशी भेटण्याची तयारी दाखविली आहे. मात्र, यातून इराणवरील निर्बंध कमी होण्याची शक्यता नाही, असेही अमेरिकेच्या अध्यक्षीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
इराणप्रश्नी ट्रम्प नरमले
सातत्याने इराणवर आगपाखड करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थोडी नमती भूमिका घेतली असून, इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी बिनशर्त ...
Maharashtra Times 1 Aug 2018, 4:00 am