अ‍ॅपशहर

Rafale Jets राफेलच्या हवाई तळाजवळ इराणने क्षेपणास्त्र डागले; पायलट सतर्क

Iran Missile Launch Rafale Jet:इराणने युएईच्या अल धाफ्रा हवाई तळाजवळ क्षेपणास्त्र डागली. या हवाई तळावर भारताकडे येण्यास सज्ज असलेले राफेल विमाने दाखल झाली आहेत. इराणने क्षेपणास्त्र डागल्यानंतर भारतीय पायलट्सना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jul 2020, 10:00 am
दुबई: अमेरिकेसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इराणने मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीमधील फ्रान्सच्या अल धाफ्रा हवाई तळाजवळच्या परिसरात काही क्षेपणास्त्र डागली असल्याचे समोर आले. इराणकडून क्षेपणास्त्र डागण्यात आल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला. या हवाई तळावर भारतात येणारे पाच राफेल फायटर जेटही होते. इराणच्या क्षेपणास्त्र धोक्याला लक्षात घेता भारतीय पायलट्सना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम राफेलच्या ठिकाणाजवळ इराणने क्षेपणास्त्र डागले; पायलट सतर्क


अमेरिकन सेंट्रल कमांडने ही या घटनेला पुष्टी दिली आहे. इराणने मंगळवारी स्ट्रेट ऑफ हरमुजजवळ अनेक क्षेपणास्त्रे डागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने आखाती खाडीजवळ अमेरिकन आणि फ्रान्सच्या लष्करी तळाजवळ ही क्षेपणास्त्र चाचणी केली. कमीत कमी तीन क्षेपणास्त्रे समुद्रात डागण्यात आली. इराणचा या भागात युद्ध सराव सुरू आहे. त्याअंतर्गत ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढत आहे. अमेरिका इराणवर कधीही हल्ला करू शकतो अशी भीती इराणला आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणने युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. इराणने अमेरिकन युद्धनौका निमित्झसारखी एक खोटी युद्धनौका तयार केली असून त्यावर हल्ल्याचा सराव केला असल्याचे वृत्त आहे.

वाचा: हरिकेन ते राफेल...भारतीय हवाई दलातील फ्रान्सची लढाऊ विमाने

युद्ध सरावा दरम्यान इराणची क्षेपणास्त्रे कतारच्या अल उदेइद आणि युएईच्या अल धाफ्रा या हवाई तळाजवळ पडली. अल धाफ्रा हवाई तळावर भारतीय हवाई दलात दाखल होण्यास सज्ज असलेल्या राफेल विमाने उभी होती. इराणकडून क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर हवाई तळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. राफेलसोबत असलेल्या भारतीय पायलट्सना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

वाचा: होय, यापुढेही अणवस्त्र बनवत राहणार: किम जोंग उनची घोषणा

दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास युएईमधून राफेल विमाने भारताकडे झेप घेणार आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही विमाने अंबाला हवाई तळावर दाखल होणार आहे. यावेळी भारतीय हवाई दलाचे प्रमुखही उपस्थित राहणार असल्याचे समजते. जगातील सर्वात प्राणघातक क्षेपणास्त्रे आणि सेमी-स्लॅथ तंत्रज्ञानाने सज्ज असणाऱ्या राफेलच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या ताकदीत वाढ होणार आहे. राफेल लढाऊ विमानांमध्ये जगातील सर्वात आधुनिक हवेतून हवेत मारा करणारी मीटिआर क्षेपणास्त्रेदेखील असणार आहेत.

आणखी वाचा:
शत्रूवर जरब बसणार! भारतात दाखल होण्यासाठी फ्रान्समधून आज उड्डाण घेणार राफेल
शांघाईजवळ अमेरिकेचे लढाऊ विमाने; चीन-अमेरिका तणाव वाढला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज