अ‍ॅपशहर

कुस्तीपटू नाविदला फाशी; सरकारविरोधी आंदोलनात होता सहभाग

Navid Afkari Executed:इराणी कुस्तीपटू नाविद अफकारीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नाविद आणि त्यांच्या दोन भावांनी दोन वर्षापूर्वी सरकारविरोधीआंदोलनात सहभाग घेतला होता. जगभरातून नाविदला फाशीची शिक्षा न देण्याची विनंती करण्यात आली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Sep 2020, 4:48 pm
तेहरान: इराणने कुस्तीपटू नाविद अफकारी यांना अखेर फाशी दिली आहे. नाविद अफकारी यांना शिराज येथे आज सकाळी फाशी देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सरकारविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर नाविद इराण सरकारच्या निशाण्यावर होते. नाविद अफकारी यांची सुटका करावी असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्याकडेही इराणने दुर्लक्ष केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Navid Afkari
कुस्तीपटू नाविद यांना फाशी; सरकारविरोधी आंदोलनात होता सहभाग


इराणमधील सुप्रसिद्ध कुस्तीपटू नाविद यांचे वय अवघे २७ वर्ष होते. सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे भाऊ वाहिद आणि हबीब यांना ५४ आणि २७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. शिराजमध्ये झालेल्या आंदोलनात सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. त्या गुन्ह्याखाली नाविद यांना शिक्षा ठोठावण्यात आली. गुन्हा कबूल करण्यासाठी नाविद यांच्यावर तुरुंगात अमानुष अत्याचार करण्यात आले.

वाचा: पाहा: लाखो एकर जंगलाला भीषण आग, शेकडो घरे भस्मसात

वाचा: पाकिस्तान: हजारोंचा जमाव रस्त्यावर; कराचीमध्ये शियाविरोधी आंदोलन तीव्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून नाविद यांना शिक्षा न करण्याचे आवाहन केले होते. नाविद यांना क्षमा केल्यास आणि फाशी न दिल्यास आपण इराण सरकारचे कृतज्ञ राहू. ट्रम्प यांच्याशिवाय, जगभरातील क्रीडापटूंनी फाशी न देण्याची विनंती इराण सरकारकडे केली होती. मात्र, इराण सरकारने याकडे दुर्लक्ष केले.

वाचा: वुहानच्या प्रयोगशाळेत करोना विषाणूची निर्मिती; चीनमधून पळालेल्या शास्त्रज्ञाचा दावा

एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी नाविदला फाशी दिली असल्याचे वृत्त इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलने दिले. शिराज येथील आदिलाबाद तुरुंगात ही शिक्षा दिली. फ्रीस्टाइल आणि ग्रोको-रोमन कुस्तीपटू असलेल्या २७ वर्षीय नाविदने देशात आणि विदेशातील स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज