अ‍ॅपशहर

इस्त्रायल झाले ज्यू राष्ट्र

इस्त्रालयच्या संसदेने एका कायद्याद्वारे इस्त्रालय हे ज्यू राष्ट्र असल्याचे गुरूवारी जाहीर केले. 'ज्यूइश नेशन स्टेट लॉ' असे या वादग्रस्त कायद्याचे नाव असून, या कायद्यामुळे आखाती देशांच्या रोषात भर पडली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2018, 12:16 pm
वृत्तसंस्था, जेरूसलेम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम israil


इस्त्रालयच्या संसदेने एका कायद्याद्वारे इस्त्रालय हे ज्यू राष्ट्र असल्याचे गुरूवारी जाहीर केले. 'ज्यूइश नेशन स्टेट लॉ' असे या वादग्रस्त कायद्याचे नाव असून, या कायद्यामुळे आखाती देशांच्या रोषात भर पडली आहे.

इस्त्रालयच्या नव्या कायद्यानुसार हिब्रु भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याआधी अरेबिक ही अधिकृत भाषा होती. कायदा मंजूर झाल्याची घोषणा झाल्यावर अरब लोकप्रतिनिधींनी संसदेत तीव्र संताप व्यक्त केला. एका खासदाराने काळा झेंडा फडकावला, तर अन्य लोकप्रतिनिधींनी विधेयक फाडून टाकले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज