अ‍ॅपशहर

चेहरा ये बदल गया...

‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा...’ अशीच भावना जणू अँडी सँडनेसची आहे. अमेरिकेतील ३२ वर्षीय अँड्र्यू (अँडी) सँडनेस याला आता ‘दुसरा चेहरा’ प्राप्त झाला आहे. सुमारे अकरा वर्षांपूर्वी बंदुकीची गोळी लागल्यामुळे त्याचा चेहरा ओळखण्यापलीकडे झाला होता. इतकेच नव्हे, तर चावणे, बोलणे, श्वास घेणे, वास घेणे या मूलभूत क्रियाही त्याला करता येत नव्हत्या.

Maharashtra Times 21 Feb 2017, 5:14 am
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम it has changed the face
चेहरा ये बदल गया...


‘नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा...’ अशीच भावना जणू अँडी सँडनेसची आहे. अमेरिकेतील ३२ वर्षीय अँड्र्यू (अँडी) सँडनेस याला आता ‘दुसरा चेहरा’ प्राप्त झाला आहे. सुमारे अकरा वर्षांपूर्वी बंदुकीची गोळी लागल्यामुळे त्याचा चेहरा ओळखण्यापलीकडे झाला होता. इतकेच नव्हे, तर चावणे, बोलणे, श्वास घेणे, वास घेणे या मूलभूत क्रियाही त्याला करता येत नव्हत्या. मात्र, एका दात्यामुळे चेहरारोपणाची शस्त्रक्रिया झाल्याने अँडीचा जणू पुनर्जन्मच झाला आहे.

मेयो क्लिनिकच्या रॉकेस्टर कॅम्पसमध्ये गेल्या वर्षीच ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तब्बल ५० तास चाललेल्या या शस्त्रक्रियेवेळी सर्जन, डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील तज्ज्ञांचे मोठे पथक कार्यरत होते. शस्त्रक्रियेनंतरचे रूप कसे दिसेल, याबाबत त्रिमितीय चित्रांद्वारे; तसेच आभासी नियोजनाद्वारे या शस्त्रक्रियेची रंगीत तालीम घेण्यात आली होती. आता अँडीचे नाक, वरचा आणि खालचा जबडा, दात, गाल, लाळग्रंथी, त्वचा आणि चेहऱ्याचे स्नायू पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. महिन्याभरात अँडी त्याच्या पूर्व व्योमिंग येथील निवासस्थानी जाऊ शकतो, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

अँडी आश्चर्यकारक व्यक्ती आहे. ही भेट स्वीकारण्यास तो खरेच लायक आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो आमच्याकडे उपचार घेत असून, या सर्व प्रक्रियेसाठी त्यानेही चांगली तयारी केली होती.

- समीर मार्दिनी, सर्जन, मेयो क्लिनिक

शस्त्रक्रियेनंतर मिळालेल्या रूपामुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. मी आता नेहमीप्रमाणे अन्न चावू आणि खाऊ शकतो. चेहऱ्यांच्या नसांचे कामही हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

- अँड्रयू सँडनेस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज