अ‍ॅपशहर

काबुलमध्ये हल्ल्यात ३० जण ठार

अफगाण‌स्तिानातील सर्वांत मोठ्या लष्करी रुग्णालयावर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३० जण ठार झाले आहेत. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी आयएसने स्वीकारली आहे.

Maharashtra Times 9 Mar 2017, 3:25 am
काबुल : अफगाण‌स्तिानातील सर्वांत मोठ्या लष्करी रुग्णालयावर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३० जण ठार झाले आहेत. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी आयएसने स्वीकारली आहे. अफगाणिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर तब्बल सहा तास सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kabul military hospital attack leaves 30 dead
काबुलमध्ये हल्ल्यात ३० जण ठार


स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास अनेक बंदूकधारी सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयात घुसले. त्यातील एका दहशतवाद्याने दक्षिणेकडील प्रवेशद्वारावर येताच स्वतःला बॉम्बस्फोटाने उडवून देत रुग्णालयात प्रवेश करून अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज