अ‍ॅपशहर

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; २ ठार, १५ जखमी

अमेरिकेतील मिसौरी राज्यातील कंसास सिटी येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून या गोळीबारात १५ लोक जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री या भागात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एका पार्किंगच्या ठिकाणी एका महिलेसह दोघांचे मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2020, 5:21 pm
कंसास सिटी: अमेरिकेतील मिसौरी राज्यातील कंसास सिटी येथे झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून या गोळीबारात १५ लोक जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री या भागात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एका पार्किंगच्या ठिकाणी एका महिलेसह दोघांचे मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कंसासमध्ये अंदाधुंद गोळीबार


'इथे' जळती सिगारेट बाहेर फेकल्यास ५ लाखांपर्यंत दंड

ठार झालेल्या लोकांपैकीच एकाने हा गोळीबार केल्याचा पोलिसांचा कयास आहे. या गोळीबाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बारमध्ये प्रवेश करण्याची वाट पाहत उभ्या असलेल्या लोकांवर या हल्लेखोराने गोळीबार केला. हा गोळीबार नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला याबाबत स्पष्टता नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्लेखोराला सशस्त्र सुरक्षा रक्षकाने ठार केले.

सरकारविरोधी आंदोलनांचा भडका

अचानक सुरू झाालेल्या या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली. घटनेते वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबारात एकूण १५ लोक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे संमजते.

म्यानमारमधील ‘कॉरिडॉर’वर चीनचा डोळा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज