अ‍ॅपशहर

काश्मीरसाठी पाक लष्करानं रचलं गीत

पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून यावेळी पाकिस्तानी लष्कर आणि सरकार दोघांनी मिळून भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानी लष्करानं काश्मिरी जनतेला पाठिंबा म्हणून एक गाणंही रचलं असून त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Maharashtra Times 5 Feb 2017, 1:09 pm
मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kashmir core dispute between india pak sharif
काश्मीरसाठी पाक लष्करानं रचलं गीत


पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून यावेळी पाकिस्तानी लष्कर आणि सरकार दोघांनी मिळून भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानी लष्करानं काश्मिरी जनतेला पाठिंबा म्हणून एक गाणंही रचलं असून त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

काश्मीर प्रश्न धगधगत ठेवण्यासाठी पाकिस्तानकडून दरवर्षी ५ फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'काश्मीर दिवस' साजरा केला जातो. त्याचंच औचित्य साधून आज पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विभागानं काश्मीरवरील गीताचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यावेळी काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली. 'काश्मीर हा भारत-पाक फाळणीचा अर्धवट अजेंडा आहे. हा प्रश्न सुटल्याशिवाय शांतता आणि विकास अशक्य आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी तिसऱ्या पक्षानं मध्यस्थी करण्याची गरज शरीफ यांनी यावेळी व्यक्त केली. 'आंतरराष्ट्रीय समुदायानं काश्मीरच्या जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार दिला आहे. मात्र, गेल्या ७० वर्षांपासून भारतानं काश्मिरींना हा अधिकार दिलेला नाही. काश्मिरीना त्यांचा हा अधिकार मिळवून देण्यासाठी पाकिस्तान त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देईल,' अशी दर्पोक्तीही शरीफ यांनी केली.

दुसरीकडं, पाक लष्करानं काश्मीरवर रचलेल्या गीतातून भारताला काश्मीर सोडण्याचं आवाहन केलं आहे. 'संगबाज: पत्थर फेंकने वाले' असं या गीताचं शीर्षक आहे. काश्मीरमधील खऱ्याखुऱ्या दृश्यांचाच या गीताच्या चित्रीकरणासाठी वापर करण्यात आल्याचं व्हिडिओतून दिसत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज