अ‍ॅपशहर

​ कोरियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात 'व्हायग्रा'चा खच

मटा ऑनलाइन वृत्त । सोलदक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षा पार्क ग्युन हे या सध्या व्हायग्राच्या गोळ्या खरेदीवरुन वादग्रस्त ठरल्या आहेत. एक विशिष्ट आजार टाळण्यासाठी या गोळ्यांची खरेदी केल्याचा खुलासा राष्ट्राध्याक्षांच्या कार्यालयाने केला आहे.

Maharashtra Times 24 Nov 2016, 3:30 pm
महाराष्ट्र टाइम्स.कॉम koreas park now in viagra mess
​ कोरियन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात 'व्हायग्रा'चा खच
मटा ऑनलाइन वृत्त । सोल

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षा पार्क ग्युन हे या सध्या व्हायग्राच्या गोळ्या खरेदीवरुन वादग्रस्त ठरल्या आहेत. एक विशिष्ट आजार टाळण्यासाठी या गोळ्यांची खरेदी केल्याचा खुलासा राष्ट्राध्याक्षांच्या कार्यालयाने केला आहे.

विरोधी पक्षाच्या एका खासदाराने या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याने पार्क यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्राध्याक्षांच्या कार्यालयाने व्हायग्राच्या ३६० गोळ्या खरेदी केल्या होत्या. या गोळ्या खरेदी केल्याचे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने मान्य केले आहे. पार्क यांनी नुकताच ईथिपिया, युगांडा आणि केनियाचा दौरा केला होता.त्यावेळी व्हायग्रा आणि पिल्स खरेदी करण्यात आल्या होत्या. परंतू त्याचा वापर करण्यात आला नव्हता, असे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

राष्टाध्याक्षांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांसाठी या गोळ्यांची खरेदी करण्यात आली होती. त्यांना ऊंच ठिकाणांवर जावे लागते.त्यामुळे विशिष्ट आजार होऊ शकतो. या आजारापासून त्यांचा बचाव करण्यासाठी या गोळ्यांची खरेदी करण्यात आल्याचे पार्क यांच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.पार्क यांच्यावर यापूर्वीही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. त्यात या नव्या लचांडामुळे पार्क यांची डोकेदुखी वाढली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज