अ‍ॅपशहर

कुलभूषण केस: पराभवानंतरही पाक पंतप्रधानांचा विजयी थाट

कुलभूषण जाधवप्रकरणी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे)मध्ये तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विजयी थाटात ट्विट केलं आहे. कुलभूषण जाधव यांची कोर्टाने मुक्तता केली नसल्याचं सांगत आंतरराष्ट्रीय कोर्टात जणू काही पाकिस्तानचाच विजय झाल्याचा आव इम्रान खान यांनी आणला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jul 2019, 12:39 pm
इस्लामाबाद: कुलभूषण जाधवप्रकरणी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे)मध्ये तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विजयी थाटात ट्विट केलं आहे. कुलभूषण जाधव यांची कोर्टाने मुक्तता केली नसल्याचं सांगत आंतरराष्ट्रीय कोर्टात जणू काही पाकिस्तानचाच विजय झाल्याचा आव इम्रान खान यांनी आणला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imran-khan


आयसीजेने भारताची बाजू ऐकून घेत कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देताना जाधव यांचं संरक्षण करण्याचे आदेश पाकिस्तानला दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयाच इम्रान खान यांनी ट्विटद्वारे स्वागत केलं आहे. 'आयसीजेने कमांडर कुलभूषण जाधव यांची मुक्तता करण्याचे आणि त्यांना भारतात परत पाठवण्याचे आदेश दिलेले नाहीत. पाकिस्तानच्या नागरिकांविरोधात केलेल्या गुन्ह्यातील ते आरोपी आहेत. पाकिस्तान कायद्यानुसार पुढची कारवाई करेल,' असं इम्रान यांनी म्हटलं आहे.


या खटल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही कायद्यानुसारच पाकिस्तान पुढची कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. आंतरराष्ट्रीय समुदायातील जबाबदार सदस्य म्हणून पाकिस्तानने सुरुवातीपासूनच सहकार्याची भावना ठेवली आहे. अत्यंत कमी वेळात नोटीस मिळाल्यानंतरही पाकिस्तानने कोर्टात आपली बाजू मांडली, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज