जम्मू : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कमांडो हुतात्मा झाला असून आणखी एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानावर उपचार सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यातील साडू गंगा जंगलाच्या परिसरात ही घटना घडली. मुकुल मीना असे हुतात्मा झालेल्या कमांडोचे नाव असून तो 'थ्री पॅरा रेजिमेंट'मध्ये होता, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी शोध मोहिम सुरू केली. या दरम्यान, जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत लष्कराचा एक कमांडो हुतात्मा झाला.
या वर्षात सुरक्षा दलांनी १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे.
--------------