अ‍ॅपशहर

जेटली म्हणाले, गुजरातची निवडणूक होऊ द्या!

नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरणाऱ्या टीकाकारांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ द्या. जनता कोणासोबत आहे ते कळेल,' असं जेटली यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 16 Oct 2017, 6:49 am
मटा ऑनलाइन वृत्त । वॉशिंग्टन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम let results of gujarat elections come out then it will be clear who ppl support jaitley over demonatisation gst
जेटली म्हणाले, गुजरातची निवडणूक होऊ द्या!


नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरणाऱ्या टीकाकारांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ द्या. जनता कोणासोबत आहे ते कळेल,' असं जेटली यांनी म्हटलं आहे.

जेटली सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून वॉशिंग्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमात जीएसटी व नोटाबंदीच्या परिणामांबाबत बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं. 'उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक नोटाबंदीनंतर झाली होती. तिथं काय झालं हे सर्वांनीच पाहिलं आहे. यूपीत भाजपनं प्रचंड बहुमत मिळवलं होतं. गुजरातच्या निकालानंतर पुन्हा एकदा याची प्रचिती येईल,' असं जेटली म्हणाले.
Structural reforms like IBC insolvency code,GST,demonetization need courage&globally India is praised for such bold steps:FM Jaitley in US pic.twitter.com/xXpuSYjg6g — ANI (@ANI) October 15, 2017 'जीएसटी आणि नोटाबंदीसारखे निर्णय घेण्यासाठी धाडस लागतं. भारताच्या या धाडसी निर्णयांचं जगभरात कौतुक होतंय. गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. भारताची अर्थव्यवस्था मात्र प्रगतीपथावर आहे. जगातील परिस्थितीचा फायदा उचलत भारतानं अर्थव्यवस्थेत अनेक रचनात्मक सुधारणा केल्या आहेत,' असा दावाही त्यांनी केला. काँग्रेसशासित राज्यांच्या सर्व अर्थमंत्र्यांनी जीएसटीला पाठिंबा दिला होता. मात्र, आता काँग्रेस संधीसाधू राजकारण करत आहे,' असं जेटली म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज