अ‍ॅपशहर

Coronavirus मस्तच! करोनाबाधितांवर स्मार्ट हेल्मेटच्या मदतीने पोलिसांचे लक्ष

कमी चाचणी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आता सार्वजनिक ठिकाणी संशियत करोनाबाधितांची ओळख पटवण्यासाठी मलेशियन पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. येथील पोलीस स्मार्ट हेल्मेटचा वापर करत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2020, 5:10 pm
Smart Helmet for coronavirus infection : करोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. करोनाविरोधातील लढाईत तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. मलेशियातही तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. मलेशियात सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. अशातच करोनाचा संसर्गही वेगाने वाढत आहे. कमी चाचणी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आता सार्वजनिक ठिकाणी संशियत करोनाबाधितांची ओळख पटवण्यासाठी मलेशियन पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. येथील पोलीस स्मार्ट हेल्मेटचा वापर करत आहे. या स्मार्ट हेल्मेटच्या मदतीने रेल्वे, बस आणि गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या तापमानावर लक्ष ठेवत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम malaysian police keep an eye on corona infected through smart helmets
Coronavirus मस्तच! करोनाबाधितांवर स्मार्ट हेल्मेटच्या मदतीने पोलिसांचे लक्ष


एक मिनिटात २०० व्यक्ती स्कॅन

या स्मार्ट हेल्मेटनुसार, पोलीस एका मिनिटात जवळपास २०० जणांचे स्कॅनिंग करून तापमान तपासू शकतात. ज्या व्यक्तीच्या तापमानात वाढ झालेली आढळेल त्यांची करोना चाचणी केली जाऊ शकते. तज्ज्ञांनुसार, शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान असणे हे करोनाचे लक्षण समजले जाते. भारतातही दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या गर्दीच्या शहरात हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते.

स्मार्ट हेल्मेट काम कसं करतं?

या हेल्मेटमध्ये एक थर्मल कॅमेरा आहे. हा थर्मल कॅमेरा हेल्मेटमधीलच एका स्मार्टवॉचशी जोडला गेला आहे. या कॅमेऱ्यासमोर येणाऱ्या व्यक्तीचे तापमान स्मार्टवॉचच्या माध्यमातून हेल्मेटच्या स्क्रिनवर दिसते. हा थर्मल कॅमेरा एकाच वेळी अनेकांच्या तापमानाची नोंद करू शकतो.

कमी करोना चाचणी; चिंता वाढली

कमी करोनाचा चाचणी करणाऱ्या आशियाई देशांमध्ये मलेशियाचाही समावेश आहे. मलेशियात आतापर्यंत १६ हजार ८८० करोनाबाधित आढळले आहेत. तर, १६३ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील काही महिन्यांपासून मलेशियाच्या कब्रस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर शव दफन केले जात आहेत. त्यामुळे सरकार करोनाबाबते आकडे लपवत असल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे.

राजकीय उलथापालथी सुरूच!

मलेशियामध्ये सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय घमासान सुरू आहे. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत नसल्याचा दावा त्यांनी केला असून देशाच्या सुल्तानाकडे याबाबतचे पुरावे दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे बहुमत असून सरकार स्थापन करू शकतो असे विरोधी पक्षनेते अन्वर इब्राहिम यांनी म्हटले. त्यांनी पंतप्रधान मुहिद्दीन यासीन यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज