अ‍ॅपशहर

पोटात अडकला ८ इंचांचा डिओ कॅन; तरुणाला वेदना असह्य, कण्हत कण्हत हॉस्पिटल गाठलं अन् मग...

पोटात असह्य वेदना होत असल्यानं तरुणानं रुग्णालय गाठलं. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीनं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुदैवानं तरुणाची प्रकृती ठीक आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2023, 5:03 pm

हायलाइट्स:

  • पोटातून काढला ८ इंचांचा डिओ कॅन
  • तरुणावर रुग्णालयात शस्त्रक्रिया
  • एका दिवसानंतर तरुणाला डिस्चार्ज
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम x ray
तेहरान: पोटातील डिओचा कॅन काढण्यासाठी ३० वर्षीय तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरुणानं गुदद्वारातून डिओचा कॅन आत सरकवला होता. थोड्याच वेळात त्याला असह्य वेदना सुरू झाल्या. त्यानं रुग्णालय गाठलं. तरुणाच्या पोटाच्या एक्स-रेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्याच्या पोटात अडकलेला डिओचा कॅन अगदी स्पष्ट दिसत आहे.
पोटात असह्य वेदना होत असल्यानं तरुण रुग्णालयात गेला. त्याला तातडीनं वैद्यकीय सहाय्य देण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डिओचा कॅन बाहेर काढण्यात आला. आता तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याला एक दिवसानंतर घरी पाठवण्यात आलं. व्हिज्युअल जर्नल ऑफ इमर्जन्सीमध्ये याबद्दलची माहिती प्रकाशित झाली आहे.
१४ वर्षांच्या विद्यार्थिनीनं शाळा पेटवली; २० जण जिवंत जळाले; तपासातून धक्कादायक कारण उघड
इराणच्या तेहरानमध्ये राहत असलेल्या ३० वर्षीय तरुणानं गुदद्वारातून डिओचा कॅन आत टाकला. त्यानंतर काही वेळातच त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या. डिओचा कॅन त्याच्या पोटात अडकला होता. त्यानं तेहरान वैद्यकीय विज्ञान विद्यापीठात धाव घेतली. डॉक्टरांनी एक्स रे काढला. त्यात त्यांना पोटात अडकलेला डिओचा कॅन दिसला.

तेहरान वैद्यकीय विज्ञान विद्यापीठातील डॉक्टरांनी त्यांचा अनुभव पणाला लावत शस्त्रक्रिया केली आणि तरुणाच्या पोटातील कॅन बाहेर काढला. तरुणाला एक दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तरुणानं डिओचा कॅन गुदद्वारातून आत का टाकला होता, या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.
बंदरात पोहोचली ७० टन केळी, साठा पाहून कुत्रा भुंकू लागला; थेट कंटेनरवर चढला, आत काय सापडलं?
अशाच प्रकारची घटना याआधी चीनमध्ये घडली होती. झिंगहुआ प्रांतातील एका व्यक्तीनं त्याच्या गुदद्वारातून २० सेंटिमीटर लांब मासा आत टाकला. बद्धकोष्ठानं त्रासला असल्यानं आपण हा प्रकार केल्याचं त्यानं सांगितलं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन गुदद्वारात अडकलेला मासा बाहेर काढला.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख