अ‍ॅपशहर

वाळवंटी प्रदेशात आढळली दोन हजार वर्ष जुनी, १२१ फूटी लांब 'मांजर'

Cat Geoglyph Found in Nazca Lines Peru: वाळवंटी प्रदेशात नाज्कामध्ये १२१ फूट लांबीची मांजर आढळली आहे. अर्थात ही मांजरीची आकृती आहे. एका डोंगरावर ही आकृती काढण्यात आली असून सुमारे दोन हजार वर्ष जुनी रचना असल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2020, 3:32 pm
लिमा: पेरूमधील वाळवंटी प्रदेशात पृथ्वीवरील आणखी एक 'आश्चर्य' सापडले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना सुमारे २२०० वर्ष जुन्या मांजरीची मोठी रेखाचित्र (Geoglyphs) आढळली आहेत. डोंगरावर आढळलेल्या या मांजरीची आकृती १२१ फूट लांब आकृती आहे. ही आकृती नाज्का संस्कृतीचा भाग असल्याचे म्हटल जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम massive Ancient Cat Geoglyph


आतापर्यंत या भागात अनेक मोठ्या आकाराच्या आकृती आढळल्या आहेत. ही मांजरीची आकृती अलास्काहून अर्जेंटिनाला जाणाऱ्या एका महामार्गाच्या जवळील एका डोंगराजवळ आहे. नाज्का लायन्समध्ये आतापर्यंत ३०० हून अधिक वेगवेगळ्या आकारांच्या आकृती आढळल्या आहेत. यामध्ये पशू आणि ग्रहांचा समावेश आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ जॉनी इस्ला यांनी सांगितले की, जेव्हा पर्यटकांसाठी बनवण्यात आलेले पॉईंट्स स्वच्छ केले असताना मांजरीचे रेखाचित्र आढळून आले. पर्यटकांना सहजपणे रहस्यमयी नाज्का लाइन्स पाहता यावेत यासाठी ही स्वच्छता करण्यात येत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी, त्या काळातील लोकांनी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाविना ही चित्रे तयार केली होती. ही चित्रे केवळ आकाशातूनच दिसू शकतात.

वाचा: सोशल डिस्टेसिंगमध्ये बर्थडे सेलिब्रेशन; २१५ कोटी रुपयांचा खर्च
वाचा: धक्कादायक! आकाशातून पडला मृत पक्षांचा पाऊस; नागरीक धास्तावले

इस्ला यांनी सांगितले की, आम्ही रेखाचित्रांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करत असताना आम्हाला काही रेषा आढळल्या. या रेषा नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे आढळून आले. आणखीही काही ठिकाणी अशा प्रकारच्या रेषा असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मागील काही वर्षात आम्ही ड्रोनच्या मदतीने डोंगराच्या सर्व भागांचे छायाचित्र घेण्यास यशस्वी झालो असल्याची माहिती त्यांनी दिली.

वाचा: प्रेषित पैगंबराचे व्यंगचित्र दाखवले; शिक्षकाचा गळा चिरला, चकमकीत आरोपी ठार

पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक आठवड्यांपर्यंत संरक्षण आणि स्वच्छतेची कामे केल्यानंतर मांजरीची आकृती दिसून आली. ही संपूर्ण आकृती १२१ फूट लांबीची आहे. या मांजरीच्या आकृतीला इसवी सनपूर्व २००० मध्ये तयार करण्यात आल्याची माहिती पुरात्वविभागाने दिली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पेरूच्या या वाळवंटी प्रदेशात १४० नाज्का लाइन्स आढळून आल्या होत्या. जपानी संशोधकांनी ड्रोन आणि एआयच्या मदतीने १५ वर्षापर्यंत संशोधन केले. या १४० नाज्का लाइन्समध्ये एक पक्षी, मानवी चेहऱ्यासारखा एक प्राणी, दोन तोंडी साप आणि एक व्हेल मासा आढळून आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज