अ‍ॅपशहर

म्युनिकमध्ये हल्लेखोरासह १० ठार

जर्मनीतील म्युनिक शहरातील ऑलिम्पिया शॉपिंग सेंटर मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात आतापर्यंत ९ जण ठार झाले आहेत. हल्लेखोरानं गोळी झाडून स्वतःलाही संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरुवातीला या हल्ल्यात दोन अथवा तीन जण सामील असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, एकच हल्लेखोर असल्याचे कारवाईनंतर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Times 23 Jul 2016, 7:55 am
मटा ऑनलाइन वृत्त । म्युनिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम munich attack 9 dead police operations ends
म्युनिकमध्ये हल्लेखोरासह १० ठार

जर्मनीतील म्युनिक शहरातील ऑलिम्पिया शॉपिंग सेंटर मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात आतापर्यंत ९ जण ठार झाले आहेत. हल्लेखोरानं गोळी झाडून स्वतःलाही संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरुवातीला या हल्ल्यात दोन अथवा तीन जण सामील असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, एकच हल्लेखोर असल्याचे कारवाईनंतर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

ऑलिम्पिया मॉलमध्ये नागरिकांवर गोळीबार केल्यानंतर एक हल्लेखोर जवळच असलेल्या मेट्रो स्टेशनच्या दिशेने पळाला. यानंतर पोलिसांनी म्युनिक रेल्वे स्थानक रिकामं केलं. तसंच मेट्रो आणि बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. हल्लेखोरांविरोधातील कारवाईचे फोटो नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करु नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि म्युनिकमधून जाणाऱ्यांनी शहराच्या बाहेरील हायवेवरून निघावं असं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, हल्लेखोरांविरुद्धची कारवाई संपल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. मृत हल्लेखोर जर्मन-इराणी वंशाचा होता. हल्ल्याचं कारण अजून समजलेलं नाही. घटनास्थळावर ज्या तीन लोकांना पळताना पाहिलं होतं, ते या हल्ल्यात सामील नव्हते, असं पोलिसांनी सांगितलं.

सर्व भारतीय सुखरुप आहेत. भारतीय उच्चायुक्तालयाने हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी 0171 2885973, 01512 3595006, 0175 4000667 हे हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज