अ‍ॅपशहर

अमेरिकेत अवतरले ट्रम्प यांचे नग्न पुतळे

निवडणूक प्रचारात बेधडक वक्तव्य करून जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आता भलत्याच कारणानं चर्चेत आले आहेत. अमेरिकेतील काही शहरांमध्ये रातोरात ट्रम्प यांचे नग्न पुतळे उभे करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला आहे. हे पुतळे तातडीनं हटविण्यात आले असले तरी त्यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

Maharashtra Times 19 Aug 2016, 12:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । न्यूयॉर्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम naked trump statues pop up in several us cities
अमेरिकेत अवतरले ट्रम्प यांचे नग्न पुतळे

निवडणूक प्रचारात बेधडक वक्तव्य करून जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आता भलत्याच कारणानं चर्चेत आले आहेत. अमेरिकेतील काही शहरांमध्ये रातोरात ट्रम्प यांचे नग्न पुतळे उभे करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला आहे. हे पुतळे तातडीनं हटविण्यात आले असले तरी त्यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

लटकलेली ढेरी, छोटी बोटे आणि अर्धवट गुप्तांग अशा अवतारात असलेल्या या पुतळ्यांना 'द एम्परर हॅज नो बॉल्स' असं शीर्षक देण्यात आलं होतं. न्यूयॉर्कमधील चळवळ्या कलाकारांच्या 'इनडिक्लाइन' नामक गटानं या प्रकाराची जबाबदारी घेतली आहे. सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजलिस, सिएटल व क्लिवलँडमध्ये देखील असे पुतळे उभारण्यात आल्याचा दावाही 'इनडिक्लाइन'नं केला आहे.

'काही वेळासाठी उभे करण्यात आलेले हे पुतळे म्हणजे काही क्षणांसाठी पडणारी वाईट स्वप्नं व अध:पतनाचं प्रतिक आहेत. राष्ट्राध्यक्ष पदासाठी संभ्रम निर्माण करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांकडं आम्हाला मागं वळून पाहायचं होतं आणि त्यांच्यावर हसायचं होतं, म्हणून आम्ही हा उद्योग केल्याचं 'इनडिक्लाइन'नं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज