अ‍ॅपशहर

'शनि'जवळ नासाचे कॅसिनी अंतराळयान नष्ट

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थे (NASA)चे कॅसिनी अंतराळयान २० वर्षांच्या शानदार प्रवासानंतर झाले. कॅसिनी अंतराळयानाचा आज सकाळपासून नासाशी संपर्क तुटला होता. हे यान त्यावेळी शनि ग्रहाच्या अतिशय जवळ दाखल झाले होते. हे यान एकाद्या पेटत्या उल्केप्रमाणे जळून नष्ट झाले.

Maharashtra Times 15 Sep 2017, 9:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । केप कॅनवेरल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nasas cassini spacecraft burns up in skies over saturn
'शनि'जवळ नासाचे कॅसिनी अंतराळयान नष्ट


अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थे (NASA)चे कॅसिनी अंतराळयान २० वर्षांच्या शानदार प्रवासानंतर झाले. कॅसिनी अंतराळयानाचा आज सकाळपासून नासाशी संपर्क तुटला होता. हे यान त्यावेळी शनि ग्रहाच्या अतिशय जवळ दाखल झाले होते. हे यान एकाद्या पेटत्या उल्केप्रमाणे जळून नष्ट झाले.

कॅसिनी हे अंतराळयान १९९७ मध्ये नासाने अंतराळात पाठवले होते. हे यान नष्ट झाल्यानंतर ८३ मिनिटांनी याची सूचना नासाला मिळाली. शनि ग्रहाच्या कक्षेत दाखल होणारे कॅसिनी हे आतापर्यंतचे एकमेव अंतराळयान होते. शनि ग्रह आणि त्याच्याभोवती असलेल्या कंकणाकृती वलयाचे दृश्य या यानामुळे अतिशय जवळून पाहता आले. कॅसिनी यानाने गुरुवारी शनि ग्रहाचा शेवटचा फोटो पाठवला होता. यानंतर आज सकाळी हे यान शनि ग्रहाजवळ दाखल झाले होते.

कॅसिनी अंतराळयान ज्यावेळी नष्ट झाले तेव्हा या यानाचा वेग प्रतितास १,२२,००० किलोमीटर इतका होता. शनि ग्रहाच्या कक्षेत १३ वर्ष राहिल्यानंतर या यानाचे इंधन संपत आले होते. यानंतर मोहीमेच्या अखेरच्या टप्प्यासाठी नासाने ग्रँड फिनाले, असे नाव दिले होते.

'ही थक्क करणारी मोहीम होती. कॅसिनी हे अद्भभूत अंतराळयान होते आणि आपण सर्वच या मोहीमेचा भाग होतो. ही मोहीम इथेच संपल्याचे आम्ही जाहीर करतो', असं या मोहीमेचे मुख्य व्यवस्थापक अर्ल मेज यांनी सांगितलं. यावेळी कॅसिनी अंतराळयानाच्या मोहीमेत सहभागी असलेल्या नासाच्या कर्मचाऱ्यांनी जांभळे टी शर्ट घातले होते. मोहीम संपल्याचे जाहीर होताच त्यांनी गळाभेट घेत एकमेकांचे आभार मानले.

Cassini showed us the beauty of Saturn. It revealed the best in us. Now it's up to us to keep exploring. pic.twitter.com/E4p1jOvFKf — CassiniSaturn (@CassiniSaturn) September 15, 2017

कॅसिनी यान अंतराळात १९९७ मध्ये सोडण्यात आले होते. सूर्य मालिकेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह असलेल्या शनिच्याजवळ २००४ मध्ये हे यान दाखल झाले होते. यानंतर २००५ मध्ये शनि ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह मानल्या जाणाऱ्या मून टाइटनवर हे अंतराळयान उतरले होते. कुठल्याही यानाने पृथ्वीपासून इतके दूर अंतर कापलेले नाही. कॅसिनी यानाने ४ लाख ५३ हजाराहून अधिक फोटो काढले होते. तसंच यानाने ४.९ अब्ज मैल इतका प्रवास केला. ही एक आंतरराष्ट्रीय मोहीम होती. यात २७ देशांनी सहभाग घेतला होता. या मोहीमेवर ३.९ अब्ज डॉलर इतका खर्च आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज