अ‍ॅपशहर

भारताविरुद्ध काड्या करणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांना घरातूनच आव्हान

भारत आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य करुन केपी शर्मा ओली स्वतःच अडचणीत आले आहेत. त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. भारताविरोधातील हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचं नेपाळमधील नेते म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2020, 11:14 am
काठमांडू : स्थानिक नेत्यांच्या मदतीने भारताकडून माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली स्वतःच अडचणीत आले आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांनी ओलींना हे आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या, असा अल्टीमेटम दिला आहे. या नेत्यांमध्ये तीन माजी पंतप्रधानांचाही समावेश आहे. बंद दाराआड झालेल्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुष्पा कमल दहल प्रचंड, माधव कुमार नेपाळ आणि झलनाथ खनल यांच्यासह माजी उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nepal leaders ask resignation from kp sharma oli
भारताविरुद्ध काड्या करणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांना घरातूनच आव्हान


भारताविरोधात ओली यांचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. भारत नव्हे, तर मी स्वतः तुमचा राजीनामा मागत आहे. या बेजबाबदार वक्तव्यासाठी अगोदर पुरावे सादर करा, अशी मागणी पुष्पा कमल यांनी केली. स्थायी समिती सदस्यांच्या मते, खनल, माधव नेपाळ आणि गौतम यांनी ओलींवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि मित्र देशाविरोधात चुकीचं आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप केला.

भारताचा माझं सरकार पाडण्याचा डाव; दिल्लीत बैठका : केपी शर्मा ओली

ओली यांनी स्थायी समिती सदस्यांना उत्तरही दिलं आहे. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील माहिती भारतीय माध्यमांपर्यंत कशी जाते, असा सवाल त्यांनी विचारला. भारत काही नेपाळमधील नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय माध्यमातील याविषयीचे वृत्त आणि काठमांडूतील भारतीय दुतावासातील चर्चा यावरुन हे स्पष्ट होतं, असा आरोप ओली यांनी केला. दुसरीकडे नेपाळमधील चीनचे राजदूत होऊ यांकी यांनी भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यावर टीका केली. नेपाळ दुसऱ्या एका देशाच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचं नरवणे म्हणाले होते.

भारतातील करोना चीनपेक्षा अधिक जीवघेणाः नेपाळ

ओली यांच्या वक्तव्यानंतर आता स्वपक्षिय नेतेच आक्रमक झाले आहेत. गौतम हे बैठकीत सर्वात आक्रमक झाल्याची माहिती आहे. पक्ष अध्यक्ष आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा राजीनामा ओली यांनी द्यावा, असं ते म्हणाले. पक्षाबाहेरुनही ओलींवर टीका होत आहे. भारताविरोधात केलेल्या आरोपांवर ओली यांनी तातडीने पुरावे सादर करावेत, अशी मागणी नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टाराय यांनी केली. भारतीय दुतावास सरकार पाडण्याचं नियोजन करत आहे, तर मग तुम्ही राजदुताला काढून का टाकत नाही, असा सवालही त्यांनी केला.

नेपाळचा नवा नकाशा; भारताच्या भूभागावर केला दावा

नेपाळमधील एका पक्षाचे सहअध्यक्ष डॉ. प्रकाश चंद्र लोहानी यांनीही ओलींवर निशाणा साधला. ओलींना बाहेर काढण्यासाठी कुणाचीही गरज नाही. त्यांना स्वतःच बाहेर पडण्याची घाई झाली आहे, असं ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज