अ‍ॅपशहर

सौदी अरेबिया घेणार मोकळा श्वास; १८ महिन्यानंतर मास्क, सोशल डिस्टेंसिंगचे निर्बंध शिथील

Saudi Arabia : सौदी अरेबियाने सरकारने करोना निर्बंध शिथील करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सौदी अरेबियातील नागरिकांची जवळपास १८ महिन्यानंतर मास्क वापरापासून सुटका होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2021, 5:13 pm
रियाध: करोना महासाथ सुरू झाल्यानंतर जवळपास १८ महिन्यानंतर सौदी अरेबियातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत घट आणि देशाातील सर्वाधिक लसीकरण दर यामुळे १७ ऑक्टोबरपासून करोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास १८ महिन्यानंतर सौदी अरेबियातील नागरिक मोकळा श्वास घेणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid-cases-Saudi Arabia
सौदी अरेबिया घेणार मोकळा श्वास; १८ महिन्यानंतर मास्क, सोशल डिस्टेंसिंगच्या निर्बंध शिथील


सौदी अरेबियातील एकूण ३४.८ दशलक्ष लोकसंख्येपैकी २०.६ दशलक्ष नागरिकांना करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. काही विशेष ठिकाणांना वगळता अन्य सार्वजनिक स्थळांवर मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार नाही. यामध्ये मक्केतील ग्रँड मशीद आणि मदिना येथील प्रेषित पैगंबर यांच्या मशिदीचा समावेश आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्वांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. दोन्ही मशिदी लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारच्या अॅपद्वारेच पूर्व नोंदणी करून जाता येणार आहे.

करोनावरील उपचारासाठी औषधाला मान्यता देण्याची मागणी

'या' लशीची ब्लू प्रिंट चोरून रशियाने तयार केली 'स्पुटनिक व्ही' लस; ब्रिटनचा खळबळजनक दावा

परिवहन सेवा, रेस्टोरंट्स, सिनेमा, सामाजिक कार्यक्रम आदी सार्वजनिक स्थळी सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करणे शिथील करण्यात आले आहे. विवाह सोहळ्यावरील निमंत्रितांच्या संख्येवरील बंधने हटवण्यात आली आहेत. निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी सॅनिटायझर वापर व इतर खबरदारी बाळगण्याचे निर्देश, सूचना देण्यात आल्या आहेत. करोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढल्यास संबंधित शहरात, भागांमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज